प्रासंगीक: मेंदुला ….कुरतडणार भयाण वास्तव…!

जगन रेप कर……………

जगन रेप कर. असं जगनला कुणी सांगत नाही.
जगन आपणहूनच रेप करतो. शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न , फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत. त्यातले सगळेच रेप करू शकतात. जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो.आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो.जगन वाईट आहे. भयानक वाईट…

वाईट जगनपैकी ही एकाची एक केस आहे.या केसमधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं.कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर. #इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही. कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा. #कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते.
पण जगनला #इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही. कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं.

बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं, पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं. पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं.

बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं. आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात.
मल्लिका मुन्नी,शीला वगैरे सगळया. शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो.कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल.आणि कॅमेऱ्याच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील.असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे.पण ते असो. चूक जगनचीच आहे.

जगनही मग #हस्तमैथुन करतो. ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं.बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला. पण मार खाऊन #इरेक्शन थांबत नाही.म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोगचित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो. आणि हस्तमैथुन करतो.

आपली परंपरा फार थोर आहे. तिचा विजय असो. आपल्या परंपरेनं शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट. पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे.

त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो.
शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं.
असं जगन समजायला लागतो. कारण त्या जगनला बिघडवतात.पण जगनला त्या आवडतात.
कारण ज्याच्यामुळे #इरेक्शनपासून सुटका मिळते
ते जगनला चांगलं वाटतं.
पण #इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही.
जगनला आता ‘बाई’ हवीच असते.
तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो.
आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो.
जगनचं जनावर होतं.

जगन पुरूष आहे. #संस्कृती प्रगत झाली तरी “”संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही.””
शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं.
#पुरूषसत्ताकतेचं
म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख,आई त्यानंतर.जगन, तू मुलगा आहेस.मुलींसारखा रडतोस काय?
जगन, तू मुलांच्यात बस बघू.
मुलींबरोबर कसला बसतोस?
जगन,मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात. क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी.
जगन, स्वयंपाक तू नाही करायचास.
पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे.
जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं.
त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं.
जगन, तू मर्द आहेस.
बाईला जिंकणं यात मर्दानगी असते.वगैरे. वगैरे…

आधीच #इरेक्शन आणि त्यात #पुरूषसत्ताकतेचंइंजेक्शन. जगन पार बिघडून गेलाय. त्याच्यातला हिंस्त्रपणा जनावरांनी लाजावं इतका वाढलाय.

कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो. त्याला फाशी द्यावी असं वाटतं.

जगनला #फाशी जरूरच द्यावी.
त्याने जगन नक्की मरेल. पण #नर उरेल!!!
कारण #नर आणि #मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत.

#नर पुन्हा #हस्तमैथुन करत वाढेल आणि #पुरूषसत्ताकतेचंइंजेक्शन त्याला दिलं जाईल.
आणि #मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील.

#शुभंकर संभोगाची.

– उत्पल वनिता बाबुराव.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

फक्त वाचू नका..!!
विचारही करा….!

-सभार महेंद्र पंडागळे

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

भीमाकोरेगाव दंगल प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटच्या मृृत्युचे गूढ वाढत चालले.

गुरू एप्रिल 26 , 2018
Tweet it Pin it Email भीमाकोरेगाव दंगल प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटच्या मृृत्युचे गूढ वाढत चालले.   पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूजाने आत्महत्या केली असून आंबेडकरी जनतेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे सरतेशेवटी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. पूजाच्या पार्थिवावर चेहरा आणि इतरत्र झालेल्या ताज्या जखमा स्पष्ट दिसल्या असल्याचे […]

YOU MAY LIKE ..