दिवसभरात पंतप्रधानांनी केल्या घोषणा –

दिवसभरात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या घोषणा

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन तसेच नवी मुंबईत सिडकोतर्फे उभारल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील ९० हजार घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केला.
कल्याण पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानावर दुपारी २.३० वाजता झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय मंत्री,राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यासाठी रवाना – 

काही ठळक घोषणा
चौथ्या औद्योगिक क्रांतिसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा देशात उपलब्धः पंतप्रधान मोदी
शिक्षण, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसायाचं पुणे केंद्रः पतंप्रधान मोदी
स्टार्ट अपमध्ये जागतिक स्तरावर देश दुसऱ्या क्रमांकावरः पंतप्रधान मोदी
स्टार्ट अप इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशन योजनेतून देशाला भविष्यात तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारः पंतप्रधान मोदी
ऑनलाइन व्यवहारात लाखो पटींची वाढः पंतप्रधान मोदी
महाराष्ट्रात ८ शहरं स्मार्ट करणारः पंतप्रधान मोदी
मेट्रो आता शहरांची लाइफलाइन बनतेयः पंतप्रधान मोदी
देशात आणखी ३०० किलोमीटरचे मेट्रो जाळे तयार करणारः पंतप्रधान मोदी
४ वर्षांत १२ पेक्षा जास्त शहरांमध्ये मेट्रोचा विस्तारः पंतप्रधान मोदी
देशात ५०० कि.मी.पर्यंत मेट्रो जाळं विणणारः पंतप्रधान मोदी  मेट्रोमुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराः पंतप्रधान नरेंद्र मोदी
२०१९ च्या अखेरीस पुण्यात १२ कि.मी.पर्यंत मेट्रो धावेलः पंतप्रधान मोदी
देशाला सुलभ वाहतूक व्यवस्था देण्याचं ध्येयः पंतप्रधान मोदी
-शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा, महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांची कर्मभूमी आणि लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी असलेल्या पुण्याला वंदनः पंतप्रधान मोदी
-कल्याण पाठोपाठ पुण्यातही पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली मराठीतून
-पुणे मेट्रोच्या भूमीपूजनच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक उपस्थित
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो ३चं भूमिपूजन
-कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे मेट्रोः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

चार वर्षांपूर्वी २०० ते ३०० रुपयांना मिळणारा एलईडी बल्ब आता ५० ते १०० रुपयांना मिळतो. हे सरकारच्या धोरणामुळेः पंतप्रधान मोदी
मुंबईत मेट्रोचं जाळ विस्तारण्यासाठी गेल्या चार वर्षात सरकारचे प्रयत्नः पंतप्रधान मोदी
 -मुंबई  देशाचं स्वप्न पूर्ण करणारी नगरीः पंतप्रधान मोदी
-जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या पहिल्या दहा शहरांमध्ये भारतीतल शहरंः पंतप्रधान मोदी 

-मुंबई, ठाण्यावरी पायभूत सुविधांवरील भार कमी करण्याचा सरकारचा प्रयत्नः पंतप्रधान मोदी
पुण्यातही मराठीतून भाषण
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे सारख्या वीरांची महाराष्ट्र ही पावन भूमी. या भूमिला नमन करतोः पंतप्रधान मोदी
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला प्रणाम, डॉ. आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि राजर्षी शहू महाराज या महाराष्ट्राच्या सुपुत्रांना माझे वंदनः पंतप्रधान मोदी 

-दहिसर -मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गाचेही पंतप्रधान मोदींनी केले भूमिपूजन

-डोंबिवली-तळोजा एमआयडीसी आणि मीरा भाईंदर ते वसई मेट्रोची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
– ठाणे- भिवंडी-कल्याण मेट्रोमुळे भिवंडी मुंबईशी जोडली जाणार
-पाच वर्षात एक कोटी प्रवाशांची सोय करणारः मुख्यमंत्री
-कल्याणकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होतंयः मुख्यमंत्री
-कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो ५ मार्गाचं भूमिपूजन
-लक्ष्मण आमच्यासाठी ‘टाइमलेस’ असतील: मोदी 

-गेल्या चार वर्षात ज्यांना पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्कार मिळालेल्यांमध्ये कॉमन मॅनला स्थानः पंतप्रधान मोदी 

-व्यंगचित्रातून लक्ष्मण यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंः पंतप्रधान मोदी
-आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रात प्रचंड ताकद होतीः पंतप्रधान मोदी 

-पंतप्रधान मोदी राजभवनातील कार्यक्रमात दाखल, ‘टाइमलेस लक्ष्मण’ पुस्तक प्रकाशन समारंभ. व्यंगचित्रका आर. के. लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

भीमा कोरेगाव प्रकरणात समाजासाठी लढणाऱ्या अड बनसोडे यांच्यावर दुःखाचा डोंगर....!

शुक्र डिसेंबर 21 , 2018
Tweet it Pin it Email आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा भीमा कोरेगाव चौकशी आयोग समोर विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे जेष्ठ वकील बी. जी. बनसोडे साहेब यांच्या पत्नी दि .साधनाताई बी.बनसोडे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 20/12/2018 संध्याकाळी 7:00 वाजता KEM रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या त्यांची अंत विधी […]

YOU MAY LIKE ..