जैश-ए-मोहम्मद’ ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली दहशतवाद्याचे छायाचित्र जारी

जैश-ए-मोहम्मद’ ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
दहशतवाद्याचे छायाचित्र जारी


पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामागे एका स्थानिक अतिरेक्याचा हात असल्याची माहिती देण्यात आली आहे. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या दहशतवाद्याचे छायाचित्र जारी केले आहे.
आदिल अहमद दार या दहशतवाद्याने हा आत्मघातकी हल्ला केला.आदिल हा पुलवामा येथील काकापोरा भागातील रहिवासी आहे. हल्ल्यानंतर लगेचच जैशकडून आदिल अहमद दार ऊर्फ गुंडीबागचा कमांडो वकास याचा एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला. हा व्हिडिओ दारने केलेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या काही वेळ आधीचा आहे. यात तो काश्मीरी मुस्लिमांवरील अत्याचाराबाबत बोलत आहे. जैशच्या बॅनरसमोर उभा राहून हातात रायफल घेतलेल्या पोझमध्ये आदिलने हे व्हिडिओ शूट केले आहे.
आपण गेल्यावर्षी जैश-ए-मोहम्मद संघटनेत दाखल झालो आणि वर्षभरानंतर आपल्याला या हल्ल्याची मोहीम देण्यात आली. जेव्हा हा व्हिडिओ रिलीज होईल तेव्हा मी जन्नत (स्वर्गात) असेन, असं आदिलने व्हिडिओत म्हटलं आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2554938741247359&id=316287665112489
सभार : महानायक ऑनलाइन

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

१८ फेब्रुवारी १९२७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधी मंडळात शपथ विधी.

सोम फेब्रुवारी 18 , 2019
Tweet it Pin it Email आज दिनांक १८ फेब्रुवारी १९२७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधी मंडळात शपथ विधी. इंग्रजांनी….. त्यांना विधी मंडळात सामावून घेतले..…पुढे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर देश हितासाठी राजकीय मतभिन्नता असून ही सत्तेत सहभागी होतात पण जेव्हा राजकरणातून आपल्या प्रामाणिक मताचा अनादर झाल्याने अर्थातच हिंदू कोड […]

YOU MAY LIKE ..