कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन-शिव विवाह


कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन

 

विषेशता कोकणात जातीच्या भिंतीत अडकलेला व विषेशता: रूढी परंपरात अडकलेला बारा बलुतेदार समाज आजही रूढी परंपरा संभाळताना दिसतो. त्यात गणपती,होळी-शिमगा,देव दवस्की,गावकी -भावकी यात अडकलेला व आपल्या परंपरागत रूढींना जपणारा समाज पहावयाला मिळतो. त्या कोकणात पाच हजार लोकांच्या उपस्थित पार पडला.. “शिव विवाह..!”

मान्यवर प्रशासकीय अधिकारी, सामाजिक राजकीय नेते यांची उपस्थिती,

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथील कुणबी समाजातील युवा पिढी विज्ञानवादी बदल स्वीकारत असून, जुन्या परंपरा, पीठिका यांना झिडकारून नवीन बदल झपाट्याने स्वीकारत आहे. आपण बदललो तरच पुढची पिढी बदल स्विकारेल आणि ही सुरुवात स्वतापासून करणारे चिपळूण तालुक्यातील पालवण गावचे सुपुत्र अनंत जीवा मांडवकर यांनी शिवमती ‘वैशाली’ आयु.बाळकू विश्राम खांबे (पोलीस पाटील) राहणार मु. मांडकी, चिपळूण, यांची कन्या, हिज सोबत ‘शिव विवाह’ बुधवार दि. 18 एप्रिल 2018 रोजी, दुपारी 3.15 वाजता केला. शेतकरी राजा सम्राट बळीराजा, संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, कुळवाडी भूषण शिवराय, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांना साक्ष ठेवुन विवाह सोहळा पार पडला.

या विवाह सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित होते. तसेच हा सोहळा पाहण्यास पाच हजारापेक्षा जास्त बंधू-भगिनी उपस्थित होते. शिवश्री अनंत भिवा मांडवकर हे कुणबी युवा मुंबईचे प्रचारक आहेत.

समाजात वैचारिक परिवर्तन व्हावे म्हणून त्यांनी हे धाडस केले व शिव विवाह केला. यासाठी त्यांनी आपल्या परिवारासोबत नातेवाईक यांचे मन परिवर्तीत केले.

यानिमित्त गावात शिकणाऱ्या ८० विद्यार्थी यांना त्यांनी स्कूल बॅग चे वाटप केले तसेच लग्नाला  हजर राहिलेल्या प्रत्येक बांधवास त्यांनी एक वृक्ष भेट म्हणून दिले.

कुणबी समाजात परिवर्तन क्रांतीला सुरुवात व्हावी म्हणून त्यांनी हे सामाजिक कार्य केले. . हा विवाह अगदी सध्या पद्धतीत संपन्न झाला. कुणबी-मराठा-ओबीसी या बहुजन समाजाला दिशा देणारा…….कर्मकांड..आणि गुलामीतून मुक्त करणारा…..आणि नव्या पिढीला आदर्श असा
‘”शिव विवाह”’ कोकणातील चिपळूण तालुक्यात, पालवण गावी कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोशी यांच्या हस्ते पार पडला.

तसेच सत्यनारायणाच्या पूजे ऐवजी ‘ सम्राट बळीराजा यांची महापूजा घालण्यात येणार असून खरी कृषी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. या सोहळ्यासाठी कुणबी युवा मुंबई तर्फे युवा अध्यक्ष माधव कांबळे, विष्णू खापरे, योगेश मालप, युवराज संतोष, चिपळूण तालुका कुणबी समाज सेक्रेटरी दीपक पागडे, युवाध्यक्ष भाई कुळे, हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

ह्या दोन्ही उभयतांचे समाजातील सर्वच स्तरातुन अभिनंदन तसेच त्यांच्या दोन्ही कुटुंबाचे आभार.

कुणबी युवा संघ अनेक वर्षांपासून सातत्याने प्रबोधन करत येत आहे. समाजात असा अमुलाग्रह परिवर्तन करणार्‍या कुणबी संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकते यांचहीे अभिनंदन करण्यात येत आहे.

शब्दांकन -किरण तांबे
उपाध्यक्ष
अस्मिता मल्टिपरपज ऑर्गनाझेशन मुंबई

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

भंडार्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा आंबेडकरी जनता काढेल काय?

रवि एप्रिल 22 , 2018
Tweet it Pin it Email भंडार्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा आंबेडकरी जनता काढेल काय? नुकताच भंडार्‍याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. ज्या महामानवांनी भारतीयांच्या जीवनात अमुलाग्रह असा बदल घडवुन आणला,रक्तरंजीत क्रांतीवीना संसदीय लोकशाही देवून भारताची आधुनिक […]

YOU MAY LIKE ..