आमच्या प्राणप्रिय बापाच्या मानवी मूल्यांसाठी..

तुम्ही कितीही लढवा युक्ती |तुम्ही कितीही लावा शक्ती |
नाही पडणार भीमाचा किल्ला | लय मजबूत भीमाचा किल्ला |

बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास ज्या विषारी मानसिकतेने त्यावेळेस विरोध केला तिचीच पिल्लावळ काल जंतर मंतर वर घटना जाळन्यासाठी आणि बाबासाहेबांचा धिक्कार करण्यासाठी एकत्र जमली होती. ती पिल्लावळ कालही होती आज ही आहे आणि उद्याही राहील . ही पिल्लावळ ह्याच्या आगोदर चोरून. लपूनछपून हे काम करत होती ती आता खुलेआम करायला लागली एवढाच फरक आहे.हे बळ कस आलं हे सांगायला फार विद्वानाची गरज नाही.
काल त्यांनी हे कृत्य केलं त्याच म्हणूनच मला आशचर्य वाटत नाही. आश्चर्य ह्याचाच वाटत कि ही घटना होऊन अट्ठेचाळीस तास उलटले तरीही ही देशात आहाहंकार माजला नाही आणि अर्णब गोस्वामीच डिबेट पॅनल बसलं नाही. जे उठसुठ बाबासाहेबाना आणि घटनेला डोक्यावर घ्येण्याचं नाटक करत होती ती सगळी मंडळी पण कशी चीडिचूप आहेत. देशातला मीडिया चिडीचूप आहे.
जेयेनयू मध्ये देशाच्या विरोधात घोषणा दिल्या म्हणून देशद्रोहाचा कलम लावा आसा तांडव करणाऱ्या आणि घसा सुकवणाऱ्या मंडळींना कोणी गप्प बसवलंय तेच कळत नाही.पण एकमात्र आहे कि आता आम्ही ही बघनार आहोत कि हा देश ज्याला मी माझा म्हणतो आणि तो आहेच ( आमचं मूळ इथलंच ) त्या माझ्या देशाच्या बांधवांचं ,माझ्या मित्रांचं किती पोडतिडकीने ह्या देशाच्या घटनेबद्धल प्रेम आहे. जर कोणाला वाटत असेल कि ह्या प्रकारामुळे आपण देशात दंगली माजवू , पण आता त्या जाळ्यात आंबेडकरप्रेमी आणि घटनाप्रेमी अडकणार नाही. हे त्या विषवल्लीने लक्षात घ्यावं .
हो मान्य करू तुमची मनुस्मृती. हिम्मत असेल तर लगेच लागू करा .पण आगोदर ह्या देशाला सांगा ह्यात स्त्रियांविषयी , शुद्रांविषयी काय कायदे आहेत ते . एक एक श्लोक लोकसभेत आणि राज्य सभेत चर्चा करून पास करा… करा नवीन घटना म्हणजे ती मनुस्मृती लागू पण खबरदार एक ही शब्द ह्या बाबासाहेबांच्या घटनेतून घेतलात तर. स्वातंत्र्य समता बंधुता हे शब्द तर मुळीच नाही..
सर्व घटना प्रेमी, आंबेडकरप्रेमी भारतीय नागरिकांना, विशेष म्हणजे तरुणांना नम्र विनंती आहे कि आपला संयम सोडू नका. देशात अस्थिरतेच वातवरण निर्माण करून दंगली माजवण्याचा कारस्थान काही मंडळी करत आहेत. तुमची प्रतिक्रिया बघण्यासाठी काही डावपेच ठराविक मंडळी करीत आहेत. ह्या षड्यंत्राला बळी पडू नका .फक्त दोस्त कौन आणि दुश्मन कौन हे समजून घ्या.हिम्मत हारु नका , धैर्याने आणि शांततेने येणाऱ्या काळाला तोंड द्या. विचलित होऊ नका. निदर्शने करायचीच असतील तर शांत मार्गाने करा. परिस्थिती भयंकर आहे पण तरी सुद्धा एव्हड्या सहजासहजी हा भीमाचा किल्ला पडणार नाही.. लढाई काल ही लढलो आजही लढतोय आणि उद्याही ही लढू त्या आमच्या प्राणप्रिय बापाच्या मानवी मूल्यांसाठी..

अजून थोडा वेळ वेडे,
अजून थोडा वेळ
तग धरून रहायला हवं

रसद पोहचेल , न पोहचेल
जिथं त्यांनी देहच केलाय काबीज
श्वासोच्छवासांना जखडले आहे साखळदंडांनी
तिथे हृदयातला कंदील विझवून कसा चालेल?

जुलमाला काही हंगाम नसतो, कि-
जो बरसत राहतो ठराविक काळ

हेही दिवस जातील,
जसे जातात उन्हाळे पावसाळे

तो बघ दुरातून
इन्कलाबचा ध्वनी झंकारून उठलाय
ऐकतेस ना ….
……….. नामदेव ढसाळ

भारतीय संविधान चिरायू होवो…

राजेंद्र ( राजा) गायकवाड कल्याण
११/०८/2018

प्रस्तुत लेखक प्रसिध्द व्यवसाय विषक  मार्गदर्शक आणि तांत्रिक विशेषतज्ञ असून ambedkaree. com चे सल्लागार आहेत.

www.ambedkaree. com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

कोल्हापूर शहराचा बौद्ध कालीन तेजस्वी इतिहास...!

सोम ऑगस्ट 13 , 2018
Tweet it Pin it Email कोल्हापूरातील बौध्द कालीन अवशे कोल्हापूर शहराचा इतिहास प्राचीन आहे तसाच तो गौरवशालीही आहे. जुन्या कोल्हापूर संस्थानाची राजधानी म्हणून ओळख. प्राचीन काळी यालाच करवीर हे नाव होते. कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदिच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. पंचगंगा नदी जवळच ब्रम्हपुरी येथील उत्खननात प्राचीन म्हणजे २००० वर्षापूर्वीच्या […]

YOU MAY LIKE ..