डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण
डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण
सायंकाळी ५ वाजता अंत्ययात्रा
ज्येष्ठ साहित्यिक अस्मितादर्शचे संपादक पद्मश्री डाॅ. गंगाधर विठोबा पानतावणे यांचे पहाटे ३ वाजता एमआयटी हाॅस्पीटलमध्ये निधन झाले ते ८३ वर्षांचे होते.आंबेडकरी साहित्यातील एक झंझावात काळाच्या पडद्या आड….
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी आपले योगदान दिले. दलित आणि आंबेडकरी साहित्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. पाहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.त्यांच्या पश्चात इंजीनियर नंदिता आणि निवेदिता या दोन कन्या, जावई असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता छावणीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येथील. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थीव त्यांच्या निवासस्थानी “श्रावस्ती” येथे ठेवण्यात आले आहे.
-बाबा गाडे