अखेर भीमा कोरेगाव प्रकरणी : पुणे कोर्टाची भिडेला नोटीस

अखेर भीमा कोरेगाव प्रकरणी : पुणे कोर्टाची भिडेला नोटीस
भीमा कोरेगाव येथे जानेवारी महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना पुणे न्यायालयाने नोटीस दिली आहे. ही घटना घडविण्यामागे भिडे गुरुजींचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. पुणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नोटीस देण्यात आली असून, २५ एप्रिल रोजी भिडे गुरुजी किंवा त्यांच्या वकिलाने न्यायालयात हजर रहावे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा येथील हिंसाचारामागे हात असल्याच्या आरोपावरून मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. एकबोटे यांच्याप्रमाणेच भिडे यांनाही अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी सांगली, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात समर्थनार्थ मोर्चे काढले होते.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

कल्याण चा साहिल कोचरेकर— उद्याचा क्रिकेट स्टार

शुक्र एप्रिल 6 , 2018
Tweet it Pin it Email कल्याण च्या वालधुनीतील शिवाजी नगर येथील साहिल कोचरेकर बनु पाहतोय आंतराष्टिय क्रिकेटपट्टु …. लहाणपणापासुन क्रिकेटची आवड असणार्‍या साहिलने क्रिकेटमध्येच करियर करण्याचे ठरविलेय. तो सध्या कल्याणच्या सुपरिचित योगेश यांकडे तो सुभाष मैदानात क्रिकेटचे धडे घेत आहे. कल्याण मधिल विविध आंतरशाळेय स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगीरी केल्यान तो आता […]

YOU MAY LIKE ..