२२ प्रतिज्ञा अभियानांचे  डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

मिलिंद जाधव

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञादेखील दिल्या होत्या. त्या प्रतिज्ञा रोजच्या जीवनात अमलात आणाव्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माचे आधुनिक रित्या पालन करावे यावर सतत मा.अरविंद सोनटक्के साहेबांच्या मार्गदनाखाली 22 प्रतिज्ञा अभियान अविरत काम करीत आहे त्या ऐतिहासिक आणि सामान्य जणांच्या जीवनात अमुलाग्रह परिवर्तन करणाऱ्या 22 प्रतिज्ञाचे स्मरण करण्यासाठी दादर शिवाजी पार्क येथे ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त २२ प्रतिज्ञा अभियान उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. 

या वर्षी मराठी, हिंदी, गुजराती भाषेतील पत्रके, बॅनर्सच्या माध्यमातून तरुणांनी २२ प्रतिज्ञांची माहिती भीम अनुयायांना देण्यात आली. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हातात असलेले गंडे, दोरे कापण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्यात आले. 

२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत धम्माच प्रचार, प्रसार होत आहे. हा अतिशय सुंदर उपक्रम आमची संपूर्ण टीम करीत असून, समाज प्रबोधनाचे काम आम्ही हाती घेतले आहे. आम्ही बाबासाहेबांचे विचार त्या माध्यमातून पोहोचवत आहोत,’ असे धम्मप्रचारक प्रा. संजय खोब्रागडे यांनी सांगितले. 

२२ प्रतिज्ञा अभियान हा उपक्रम आम्ही गेल्या १५ वर्षांपासून राबवत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले पाहिजेत. त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. ज्यांच्या हातात गंडे-दोरे आहेत ते कापून आम्ही डॉ. बाबासाहेबांचे विचार सांगण्याचे काम करत आहोत, अंधश्रद्धा दूर करत आहोत. यातून समाजात परिवर्तन होताना दिसून येत आहे,’ असे २२ प्रतिज्ञा अभियान प्रचारक विनोद पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *