सिंह आणि जंगली कुत्रे…तर शिकागोतील जागतिक हिंदू परिषदेमध्ये एका गटाने
केली जोरदार निदर्शने ….!.

 

शिकागो :

‘एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. जग सर्वोत्तम करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे’, असे विधान भागवत यांनी यावेळी केले. दरम्यान,
सरसंघचालकांनी कुत्रे हा शब्द देशातील विरोधी पक्षांसाठी वापरला आहे,असा आक्षेप घेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर टीका केली आहे. या वक्तव्यातून सरसंघचालकांची विरोधी पक्षांप्रतीची मानसिकता दिसून येते,
असे आंबेडकर नागपूर येथे म्हणाले. महाभारतातील युद्ध आणि राजकारण यांचे उदाहरण देऊन भागवत यांनी हिंदूंचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य याबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. हिंदूंमधील विविध गटांनी एकत्र येऊन विश्वकल्याणासाठी प्रयत्न करायला हवेत,
असे आवाहनही मोहन भागवत यांनी केले.
जोरदार निदर्शने
‘हिंदू हुकूमशाही थांबवा’, ‘आमच्या शहरातून निघून जा’
शिकागो : जागतिक हिंदू परिषदेमध्ये एका गटाने जोरदार निदर्शने केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिषदेदरम्यान सरसंघचालक मोहन भागवत, सरचिटणीस दत्तात्रय होसबळे आणि अन्य सहा हिंदू नेते एका परिसंवादात सहभागी झाले होते.
त्या वेळी अचानक सभागृहात ‘हिंदू हुकूमशाही थांबवा’, ‘आमच्या शहरातून निघून जा’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून अन्य काही जणांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन महिलांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

-from Baba Gade,Aurangabad

Daily MAHANAYAK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *