शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अरुण साबळे यांची उमेदवारी जाहीर -अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला मिळाली उमेदवारी.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अरुण साबळे यांची उमेदवारी जाहीर -अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला मिळाली उमेदवारी….!

अरुण साबळे यांनी या भागात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काम अनेक वर्षे केले आहेनगर: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अरुण साबळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. याबाबत आघाडीचे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण यांनी माहिती दिली.

साबळे यांचा गाव कोपरगाव तालुक्यातील चांदेकसार. त्यांनी बी. जे. मेडिकल क़ॉलेज (पुणे) येथे एम.बी.बी.एस. चे वैद्यकीय शिक्षण घेतले.  १९९२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते शासकीय सेवेत दाखल झाले. अकोले तालुक्यात त्यांनी सात वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. संगमनेर येथे त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणऊन नऊ वर्षे सेवा केली. सध्या ते राहाता तालुक्यातील सोनोग्राफी तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

साबळे हे विद्यार्थी दशेपासूनच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील सम्यक विद्यार्थी आंदोलनात सक्रीय सहभागी झाले होते. तसेच अंधःश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षे प्रबोधनाचे काम केले.  त्यांचे वडील प्रभाकर साबळे गुरुजी हे काही काळ प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते.  

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देवून प्रकाश आंबेडकर यांनी संधी दिली. त्या संधीचे सोने करून दाखवीन. या मतदारसंघातील सांस्कृतिक दहशतवादामुळे बहुजन वर्ग भितीच्या सावटाखाली आहे. त्यांच्यासाठी माझा लढा असेल.असे अरुण साबळे  म्हणाले .
 सभार :सरकारनामा.कॉम

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *