व्यवसाय करायचा आहे?भांडवलाची गरज आहे .! मात्र सावधान ……!

व्यवसायाकरिता लागणारे भांडवल पुरवू अशी आशा देऊन समाजकंटक सर्वसामान्य लोकांची लूट करीत आहेत.

सामाजिक स्तरावर वैचारिक क्रांती करून नव्याने सधन होत असलेला आंबेडकरी समाज व्यावसायिक होण्यासाठी धडपडत आहे आणि यात काहीही चूक नाहीय . हे एक आशादायक चित्र आहे व्यवसाय करताना तो व्यवसाय असावा लागतो वा जो व्यवसाय करावयाचा आहे त्याचे संपूर्ण माहिती व अनुभव असयाला हवा .त्या साठी भांडल ही असायला हवे आणि नेमके याच बाबतीत आपला समाज मागे पडत आहे . नेमक्या याच गोष्टींचा वापर काही हुशार लोक करून विविध प्रकारचे मेळावे आणि जाहीर कार्यक्रम आयोजित करून गरजू लोकांना जाळ्यात अडकवत आहेत .,,

नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार आंबेडकरी समूहात व्यवसाहिक गोडी लावून त्यांना विकासाच्या गप्पा सांगणारे काही प्रामाणिक लोक काम करत आहेत त्यातच लोकांना आर्थिक सुब्बत्तेकडे नेण्याचे पवित्र कार्य प्रामाणिक लोक करत असताना त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून समाजातील काही संधी साधू लोक नेहमी प्रमाणे सक्रिय झाले आहेत व आर्थिक स्वावलंबी स्वप्ने दाखवून सर्वसामान्य जनतेला आर्थिक जाळ्यात खेचून त्यांची फसवणूक करीत आहेत नुकतेच एक प्रकरण www.ambedkaree.com च्या हाती आले असून त्याची छाननी करू सदर व्यक्ती आणि संस्थेला लोकांसमोर उघडे केले जाईल तरी www.ambedkaree.com च्या वतीने आपणास असे आव्हान करण्यात येते की व्यवसाय निर्माण करण्यासाठी जे काही उपयुक्त भांडवल लागते ते स्वतः उभारा मात्र कोण्या व्यक्ती वा संस्थेच्या आधारावर मोठ्या भांडवल मिळण्याकरिता आपले पैसे त्यांकडे गुंतवून आपली शुद्ध फसवणूक करून घेऊ नये .जर आपल्याला भांडवल उभारणी करावयाची असेल तर ती स्वतःच्या कुवतीनुसार करा कुणीही किती मदत करण्याची भाषा केली आणि त्या बदल्यात आपल्याकडून ठराविक रक्कम आगाऊ मागण्यात येत असेल तर आपण समवेत काही तरी अपरिमीत घडणार आहे असे समजावे.तरी आपण या पासून सावध रहाल असे समजतो .
ता क
वरील लिहिल्या प्रमाणे आपणास अनुभव आला असेल तर आमच्याकडे संपर्क करावा किंवा लवकरात लवकर आपली आपण दिलेली रक्कम लवकर परत घ्यावी अशी नम्र विनंती.
ambedkaree@gmail.com येथे आपण ई-मेल करु शकता .
-प्रमोद रा जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

1 thought on “व्यवसाय करायचा आहे?भांडवलाची गरज आहे .! मात्र सावधान ……!

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *