आद .अड प्रकाश आंबेडकर यांना लिहीलेल्या पत्राला सोशल मीडिया मधून समर्पक उत्तर.!


वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख आद.अड प्रकाश आंबेडकर यांना लिहीलेल्या पत्राला सोशल मीडिया मधून शक्य नितीन यांनी दिले समर्पक उत्तर……!

#Sakya_Nitin यांच्या वॉल वरुन.

प्रती,

श्री. महारुद्र मंगनाळे यांस,

आपण ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशून लिहिलेले आणि सोशल मीडियात फिरणारे पत्र वाचण्यात आले. पत्रकार अमेय तिरोडकर यांनी ते फेसबुकवरील काही प्रथितयश लोकांनी आपले हे पत्र शेअर केले आहे. अमेय तिरोडकरांनी तर हे पत्र शेअर करताना “यातील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे” अशी विशेष टीप देऊन हे पत्र शेअर केल्यामुळे पत्र वाचण्याची उत्सुकता वाढली.

पत्र थोडं मोठं आहे पण पत्राच सार एका ओळीत “ऍड.बाळासाहेब काँग्रेसशी युती करा कारण कॉंग्रेसच्या काळात आम्हाला निदान लिहिण्याच तरी स्वातंत्र्य होतं .” एवढच आहे. एका पत्रकाराने केवळ आम्हाला काँग्रेसच्या काळात निदान लिहायचं तरी स्वातंत्र्य होत असं म्हणत बाळासाहेबांना काँग्रेस सोबत युती करण्याचे आवाहन करणे या पत्राची मर्यादा स्पष्ट करत.

भाजप सरकारच्या काळात सगळ्याच संवैधानिक संस्था निकालात काढण्याच काम सुरू आहे या महारुद्र मंगनाळे यांच्या मताशी १००% सहमत पण त्याचा अर्थ काँग्रेसच्या संवैधानीक संस्थाचा मान राखला गेला किंवा त्यांचा गैरवापर केला गेला नाही हे अस म्हणण्याचे धाडस मंगनाळे करू शकतात काय ?

मनमर्जीने राज्य सरकारं बरखास्त करायची, कायद्याला स्वतःच्या मर्जीनुसार वळवायचं ,सुप्रीम कोर्टाच्या निकालांची उपेक्षा करायची, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात सीबीआय, व्हिजिलन्स लावून त्यांना बेजार करायचं हे उद्योग काँग्रेसने केले आहेतच.

शिक्षणाचे बाजारीकरण कोणी सुरू केले? प्लॅनिंग कमिशनवर अहलूवली यांना आणून प्लॅनिंग कमिशन डब्यात टाकायची सुरवात कोणाच्या राज्यात झाली? सेझ, मायनिंगच्या नावाखाली गरीब आणी आदिवासी जनतेला जमिनीपासून बेदखल करण्याची सुरवात कोणाच्या काळात झाली?

आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या दलित-आदिवासींना नक्षलवादी ठरवण्याची सुरवात कोणाच्या काळात झाली? खैरलांजी हे जगभरात भारताचा क्रूर जातीयवादी चेहरा उघड करणारे हत्याकांड कुणाच्या सत्तेत झाले? त्या नीच पशुवत दोषी आरोपीना पाठीशी घालणारे नेते कुणाच्या पक्षाचे होते?

हे कमी म्हणून खैरलांजीला आदर्श गावाचा तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर करून आपली निगरगट्ट जातीय मानसिकतेचा माज दाखवणारी वृत्ती कोणत्या सरकारची होती? आरएसएस सारखी ब्राह्मणवादी पुरुषसत्ताक संस्था कोणाच्या काळात वाढली?

तीनदा बंदी घालूनही आरएसएस पुनर्जीवित करण्याच पाप कोणाचं? भिडे, एकबोटे, धनंजय देसाई सारखी पिलावळ कोणाच्या काळात आणि कोणाच्या आशीर्वादाने वाढली? धरणांच्या नावावर भ्रष्टाचार कोणाच्या राज्यात झाला? धरणग्रस्तांच्या नावाचा सातबारा स्वतःच्या नावावर करून मोक्याच्या जागा पटकवणारे गुंठामंत्री कोणाच्या राज्यात जन्मास आले?

दलित हत्याकांडात दलितानांच आरोपी करू प्रकरण दाबण्याचा पॅटर्न कोणाच्या राज्यात आला? दलित-आदिवासींचा निधी वर्षानुवर्षे वापरायचा नाही आणि मग ऐनवेळी तो इतर कामासाठी वळवण्याचा पॅटर्न कोणाच्या राज्यात सुरू झाला? आरक्षणाच्या जागा वर्षानुवर्षे न भरता त्या कालांतराने ओपनच्या घशात घालून दलितांना प्रशासनातून हद्दपार करण्याचा निर्लज्जपणा कोणाच्या काळात सुरू झाला.

तर मंगनाळे जी वरची तक्रारीची यादी वाचून आपलं डोकं गरगरु लागलं असेल पण ही यादी खूप मोठी आहे. तुमच्या आसपास एवढं सगळं घडत असताना तुम्हाला चिंता आहे ती केवळ तुमच्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याची. याला दांभिकपणा का म्हणू नये? माणसांच्या जगण्याच्या अधिकाराबाबत तुम्हाला काँग्रेसला जाब विचारावासा का वाटला नाही?

सरकार काँग्रेस असो भाजपा त्यांच्या राज्यात पहिला बळी जातो तो दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजाचा आणि तरीही वर्षानुवर्षे या समाज घटकांनी तुमच्या लिहिण्याच्या स्वातंत्रसाठी स्वतःच जगण्याचं स्वातंत्र्यपणास लावावे ही अपेक्षा तरी तुम्ही कशी करू शकता?

लोकशाही प्रक्रियेत दुबळ्या समाजाला सत्तेत आणून त्याला बलशाली करणे अपेक्षित असताना काँग्रेस आणि भाजपने लोकशाहीला केवळ काही घराण्यांच्या दावणीला बांधली आहे. दलित-आदिवासी-मुसलमान समाजाने कधी सत्ता हातात घेण्याचा प्रयत्न करूच नये असे तुम्हाला वाटते का?

त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सरळ शरण जावे अस तुम्हाला वाटत का? जर तुमच्या पत्रास प्रतिसाद म्हणून जर ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली तर तुमच्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात तुम्ही वरील तक्रारी पैकी काही तक्रारिंच निवारण करू शकाल याची हमी देऊ शकता का?

तुमचा पत्र लिहिण्यामागचा हेतू प्रामाणिक असता तर तुम्ही पाहिलं पत्र काँग्रेसला लिहायची हिंमत केली असती अन नैतिकदृष्ट्या तेच योग्य देखील होते परंतु तुम्ही पत्र लिहिलं ते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना.

भाजपच्या राज्यात दलित-आदिवासी-मुस्लिम समाजाची परिस्थिती काँग्रेसच्या राज्यांपेक्षा काही वेगळी नाही. फरक हाच आहे की जे जे कॉंग्रेसने छुपेपणाने केलं ते भाजप उघडपणे करत आहे. तुमच लिहण्याचं स्वातंत्र्यां मिळवण्याच्या मोबदल्यात दलित-आदिवासी-मुसलमान समाजाचा जगण्याच्या हक्काचा बळी का देण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?

अलीकडेच काँग्रेसने मध्यप्रदेश राज्यात सत्ता येताच गोहत्ये संदर्भात रासुका कायदा करून दोन मुस्लिमांना त्यात अटकही केली आहे. विशेष म्हणजे खुद्द पी चिदम्बरम यांनीच या कायद्याचा विरोध केला आहे.परंतु काँग्रेसचे हे दुटप्पी चारित्र्य मात्र ठळकपणे समोर आले आहे.भाजप आणि काँग्रेसच्या हिंदुत्ववादात काय फरक आहे?

हा प्रश्न तुम्ही तुमच्या लाडक्या काँग्रेसला विचारून नागरिकांच्या मूलभूत हक्क अधिकाराचं हनन का सुरु आहे हा सवाल उपस्थित केला असता तर ते संयुक्तिक वाटले असते.

आज महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा वंचित समाज एकत्र येऊन आपले हक्क मिळवण्यासाठी उभा ठाकला आहे.भाजपची भीती दाखवून या समाजाचा स्वायत्त राजकारण करण्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका.वर्षानुवर्षं हीच भीती दाखवून काँग्रेसने दलित-आदिवासी आणि मुस्लिम समाजाची मतं मिळवली आहेत.

युतीच्या संदर्भात ऍड.बाळासाहेबांनी काँग्रेसकडून आरएसएसला कायद्याच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा आराखडा मागितला आहे. काँग्रेसकडे असलेल्या कायदेतज्ञांना तसा आराखडा बनवण्याची विनंती करा.आपण आपल्या पत्रात छान साखरपेरणी केली आहे पण आता कटू सत्य पचवा.

आता महाराष्ट्रातील वंचित समाज असल्या शब्दछळाला भुलणार नाही. आपला मार्ग आणि आपला नेता वंचित समाजाने निवडला आहे. वंचितांना सत्तेत आणून लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याच्या मार्गावर चालायला ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरवात केली आहे. हवं असल्यास आपण आमच्या सोबत येऊ शकता पण कृपया भाजप-आरएसएसचा बागुलबुवा दाखवण्याचा प्रयत्न करू नका.

जयहिंद ! जय-संविधान
*Sakya Nitin*

अशाच प्रकारचे मत काल जेष्ठ संपादक मा निखिल वागळे सर यांनी मॅक्स महाराष्ट्र या वेब न्यूज चायनल वर व्यक्त करून प्रकाश आंबेडकर यांचे चालले य काय …? या टॅग लाईनवर मत मांडले .

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

कॉंग्रेस - महाराष्ट्र प्रदेशच्या पत्राला अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी पाठविलेले उत्तर

सोम मार्च 4 , 2019
Tweet it Pin it Email भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्राला अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी पाठविलेले उत्तर प्रति राधाकृष्ण विखे पटील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सप्रेम नमस्कार, आपले दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ चे पत्र सायंकाळी ६.३८ वाजता मिळाले.. ..पत्रा बद्दल आभार . वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेनंतर, महाराष्ट्राच्या […]

YOU MAY LIKE ..