वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युतीने संपूर्ण राजकरणाची आणि समाजकरणांची समीकरणे बदलली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी व्यवस्थेला परिवर्तनाचा दिलेला हादरा इतका जबरदस्त होता की त्या हादऱ्यातुन ही व्यवस्था संविधानिक पातळीवर संपली आहे मात्र त्या व्यवस्थेचे मुळे जी इथल्या सामाजिक स्तरावर खोलवर रुजलेली आहे त्यांना उखडून फेकून देण्याची खरी गरज आहे .

जाती-जातीत फूट पडून कर्तबगार नेत्याविरोधात संधिसाधू राजकारण्यांना जवळ घेत आपल्या मगर मिठीत आजवर इथला प्रस्थापित राजकारणी वर्ग बहुजन समाजात फूट पडत होता आणि त्या फुटीच्या भाळभलत्या जखम समाजमानावर घेत तमाम बहुजन वर्ग जगत होता इथल्या जातीय व्यवस्थेला महामानव डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमूळे तो जबरदस्त हादरा व त्यावरील समाजमनावर उमठलेल्या प्रतिक्रिया व त्याचा जो खोलवर परिणाम झाला तो फार महत्त्वाचा त्या समग्र क्रांतीन बहुजन समाज जरी जागृत झाला असला तरी त्यांना उघडपणे आंबेडकर नावाचे सत्य स्विकारणे जड जात होते.

महामानव डॉ आंबेडकरांनी घटनेद्वारे दिलेले अधिकार आणि हक्क जरी हा समाज भोगत असला तरी डॉ आंबेडकरांचे विचार आणि अनुयायीत्व स्वीकारण्यास कचरत होता आणि याच संधीचा फायदा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि विचारवंतांनी घेऊन तमाम बहुजनांच्या उधारकर्त्यांचे उपकार विसरून हाच बहुजन आज ही विविध मत आणि विचारसरणी भिन्न असलेल्या पक्षात विखुरला गेला .

विविध राजकीय पक्षांच्या विविध सेल पहिल्या की आपणास समजेल की एके काळी जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पर्याय म्हणून बाबू जगजीवन राम याना काँग्रेसने मोठे केले तसेच इतर ही पक्ष अनेक बहुजनातील नेत्यांना त्यांना पार्यायी असे मांडलीक नेतृत्व निर्माण केले आणि पर्यायाने तमाम बहुजन वर्ग हा विविध राजकीय पक्षात विखुरला गेला आणि त्यात आंबेडकरी विचारांचे विरोधक असणारे लोक आंबेडकरी अनुयायी आणि आंबेडकरी विचारांपासून दूर करू लागले पर्यायाने सामाजिक समतेचा जगमान्य विचार पुरस्कृत करणाऱ्या पक्षाला भारतीय लोकशाहित बहुस्कृत करून तो पक्ष आणि नेते यांना जाती जाती त अप्रत्यक्षपणे बंदीस्त केले.यामुळे मानवता,राष्ट्रीय एकता ,समता आणि लोकशाही चा याचा मूळ गाभा असणारा एकमेव राजकीय पक्ष केवळ एकाच जातीपुरात मर्यादित केला गेला .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्या करीता त्यांच्याच तोडीचा किंवा तत्सम नेता नसल्याने इथल्या व्यवस्थेने आणि आंबेडकरी जनतेतील नेतृत्वाने तसा प्रयत्न न केल्याने या पक्षाला मर्यादा आल्या. पुढे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच वैचारिक नेतृत्व असल्याने विविध दुफळ्यामुळे निर्णयायक भूमिका स्पष्ट न झाल्याने आंबेडकरी राजकीय विचारांची अवस्था बिकट झाली.
गट तट यात विखुरला गेल्याने केवळ कुणाच्या मागे किती यावर त्याची किंमत आणि गरज ठरवून दावणीला बांधले जात होते आणि त्यामुळे तमाम बहुजन आंबेडकरी विचारांना राजकीय दृष्टीने महाराष्ट्रात तरी दूर करीत होता.

कुणी कितीही म्हणोत पण मागील काही वर्षात घटनाक्रम पाहता
रिपब्लिकन चळवळीत कोण्या एका नेत्यांचा मागे समाज एक होत नव्हता मात्र या दोन ते तीन वर्षे विविध सामाजिक अत्याचार,भीमकोरेगाव आदी प्रकरणात अड प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या निर्णायक भूमिका आणि त्या भूमिकेला आंबेडकरी जनतेने दिलेल्या उत्फुर्त प्रतिसाद यामुळे आज तामम आंबेडकरी जनता आद प्रकाश आंबेडकर याच्याकडे आशेने पाहत आहे .अड प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका ही आंबेडकरी जनतेच्या मनात असलेली भूमिका होती त्यामुळे तमाम आंबेडकरी जनता त्यांच्या मागे उभी राहीली व राहत आहे .

नेमके याच मुद्यावर लक्ष केंद्रित करून अड प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्याना आपल्या पुढील कार्यक्रमावर भर देणण्यास सांगून बहुजन समाजावर लक्ष दिले ज्या जातींना कोणाचेही नेतृत नव्हते व त्याना आंबेडकरी नेतृत्व स्वीकारण्यास जड जात होते त्या समाजाला ही त्यांनी आपली भूमिका समजावली आणि मग त्यातूनच उभी राहिलीं ती वंचित बहुजनांची आघाडी .

याच दरम्यान अत्यंत महत्त्वाचा आणि सामाजिक समीकरण बदलण्याचा तसेच राजकीय विश्वात खळबळ उडवणारा आणि तमाम आंबेडकरी चळवळीची नव्याने उपद्रवीता सिध्द करणारा देणारा ऐतिहासिक निर्णय औरंगाबाद येथून घेतला तो बॅरिस्टर ओवेशी यांच्या एम आई एम पक्षाशी युती .तमाम महाराष्ट्र सतत पुरोगामीत्वचा डंका पिटणाऱ्या सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्न चिन्हे दिसू लागलीच तर सतत कधीही आंबेडकरी जनतेला किंमत न देणारी उजवी विचारसरणीही या निर्णयामुळे हादरली.

कित्येकदा आद प्रकाश जी आपल्या भाषणात नेहमी अलुतेदार आणि बलुतेदार यांचा मुद्दा समजावून सांगत असत पण लोकांना त्याचे म्हणणे लवकर समजत नसे नेमके त्यांची ती निश्चित भूमीका काय आहे हे गाव खेड्यातील समाजमनापर्यंत पोहचली आणि मग काही खेड्यातला बहुजनवर्ग त्यांच्याबसोबतब चालल्याचे चित्र निर्माण होत आहे .

जी कामगिरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर तमाम आंबेडकरी नेतृत्वाने कारायावयास हवी होती ती उशिरा का होईना पण अड प्रकाश आंबेडकर यांनी केली हे कुणालाही मान्य करावेच लागेल.त्यांच्या सोबत येणारा आदिवासी,आगरी ,कोळी,धनगर,मराठा,कुणबी,भंडारी,लिंगायत,पारधी,कैकाडी,चर्मकार,मातंग,ढोर, कोल्हाटी, तेली,माळी,लोहार आशा कितीतरी वंचीत जाती आज एकत्रित येऊन त्याचे नेतृत्वाखाली लढण्यास तयार झाल्या.

आत्ता पर्यंत चालवळी ला एक खंबीर नेतृत्व गरजेचे होते ते खंबीर आहेत ही पण जनतेला त्याच्या विषयी बरीच माहिती चुकीच्या पद्धतीने सांगितली गेली प्रस्थापित मीडिया आणि प्रस्थापित राजकारणी ही त्यांच्या भूमिका सतत चुकीच्याच पद्धतिने मांडण्यात आल्या पर्यायानं सतत आंबेडकरी नेतृत्वाला भारतीय राजकारणात कमजोर आणि विकाऊ म्हणूनच शेकोल्या वाहिल्या गेल्या सतत आंबेडकरी राजकारणी हे तुडपुंज्या पदांवर व एखाद्या दुसऱ्या जागेवर शांत राहतात , त्यांचा वापर कसा ही करता येतो हा गोड गैरसमज होता तो दूर होणार आहे .आम्हाला ही स्वाभिमान आहे आम्हीही नेतृत्व करू शकतो हा स्वाभिमानच समाजाला नव्याने उभा करू शकतो हे अड प्रकाश आंबेडकर साहेबांनी ते दाखवून दिलेय.

त्यांच्या सभांना होणारी लाखोंची गर्दी पाहिलीं की समाजमन कुणाच्या सोबत आहे हे समजते कधीही पहिल्या पानावर जागा न देणारी वर्तमानपत्रे आणि शेठजींची न्यूज चायनल वाले आपला TRP पाहून त्यांच्या सभा live करू लागल्या पण हे न समजणारे काही अजूनही आंबेडकरी राजकारणी आहेत त्यांना समाजमनाचा विचार नाहीय. सर्वानी जर मिळून मोठ्या मनाने अड प्रकश आंबेडकर यांना स्वीकारले तर पुढील लढाई आणखीन निर्णयायक होईल आणि त्याने जी आंबेडकरी चळवळी ची दाहकता आहे ती प्रभावीपणे पुढे येईल.

एक लढाई अस्तित्वासाठी लढली पाहिजे अन्यथा आंबेडकरी चळवळ उभी राहण्यास कठिण होईल.

अड प्रकाश आंबेडकर यांचा निमित्ताने का होईना महाराष्ट्रातिल बहुजन समाज आंबेडकरी चळवळी सोबत येत आहे ही समाज बदलाची नवी नांदीच आहे .याचे भान आंबेडकरी धुरंधर राजकारण्यांनी आणि समाजकाराण्यांनी ठेवावयास हवे असे वाटते .
-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *