वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराच्या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च केला

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या शुक्रवारी (ता.15) जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीने जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, शनिवारी (ता.16) वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराच्या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च केला. पोलिसांकडून व्हीआयपींच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी रुट मार्च काढण्यात आला होता.

यामध्ये सीआरपीएफ, आरसीपी पथकांचा समावेश होता. मात्र, सकाळपासूनच सोशल मीडियावर या रुट मार्चचे फोटो व्हायरल झाल्याने जिल्हात राजकीय चर्चेंना जोर चढला आहे. 

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन 
शहरात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद तत्काळ सोशल मीडियावर उमटत आहेत. उलट-सुलट आणि नाहक चर्चेने शहरभर संभ्रम निर्माण होत आहे. या सगळ्या घडामोडींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून सोशल मिडियावरील अफवांसोबत फेक पोस्टवर विश्वास ठेवू नका असे आवाहन अकोला पोलिस विभागाच्या सायबर विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *