लढा …अस्तित्वाच्या अस्मितेचा….!

लढा …अस्तित्वाच्या अस्मितेचा….!
आज जवळजवळ चार महिने पुर्ण होत आलेत. तपासाची कामे ही पुर्ण झालीत त्यात ज्याच्यावर आरोप आहेत ते मनोहर कुलकर्णी अर्थात भिडे अजुन ही मोकाट आहेत त्याला हात लावावयाची ताकद सरकारची नाहिय.सरकार पुर्णपणे हतबल झालेय. जेव्हा राजा हतबल असतो तेव्हा आपल्या हक्कांसाठी जनता रस्त्यावर येते. हा इतिहास आहे मात्र हे फुशारक्या मारणारे राजकर्त्ये विसरलेत.

खर तर का होत नाहीय अटक….?

काही ठळक कारणे

जबरदस्त दहशत
जातीय उद्रेकाची शक्यता
जातीय व्यवस्थेला खतपाणी.

होय हे खरंय…
पध्दतशीर कार्यकर्त्ये तयार केलेत ते संमोहित प्रमाणे एका इशार्‍यावर अराजकता माजवु शकतात नुकताच झालेला व लोकसत्तेन प्रकाशित केलेले त्याच्या गडकोट मोहिमांचा रिपोर्ट त्यात हजारो तरुण सामिल झालेत. या गाव पातळिवरल्या तरुणांना जातीय अभिमानांनी अन खोट्या आदर्शांत गुंतवुन त्यांचे भावनिकपध्दतीन वापर केला गेलाय. o
शिक्षण वा रोजगारासारख्या भयानक समस्या असतांना केवळ देशभक्तीच्या भावनिक मुद्याने तरुणांना हवे तसे वापरता येते. खरंतर हा एकप्रकारचा दहशद वादच आहे.
सातार्‍याकडील जातीय उतरंड जबदस्त भयानक आहे त्यात बौध्दांना कस्तटासमान मानले जाते त्याच्यावर सामाजिक दहशत असते अन हे सवर्ण समाज बौध्दांचा तिव्रप्रमाणात तिरस्कार करतात यात सातार्‍या कडिल लोकांना अनुभव असेलच .
नेमक्या याच कारणाचा फायदा घेवुन किड्यानं आपले या परिसरात हातपाय रोवले व दहशत वादाच रोपटे लावले. आता विषवृक्ष तमाम महाराष्टाला गिळंकृत करु पाहतोय. या जातीय मानसिकतेच्या विरुध्द आवाज बळकट करण्यासाठी एकत्र येवुन लढले पाहिजे.

 

इतके दिवस झालेत सरकार चोकशीचा अहवाल काय सांगतोय.
मिलिंद एकबोटेला झालेली अटक त्याला जामिन ना मंजुर झाला तरी लढाई जिंकलेली नाहिय. भिडेला अटक होवुनये म्हणुन तात्पुरर्ता एकबोटेला अटक केली असावी. जातीयतेची दहशत काय असते याचे जीवंत उदाहरण हे असेल. वायफाय अन ५जीच्या जमान्यात वावरणारे लोक ही जातीअंत करु शकले नाहित उलट ती अधिक बळकट करण्यासाठी कटकारस्थान रचली जातात.याच दहशती खाली किडेला अटक करण्याच धाडस देवेंद्र महाशय कर?नाहीय. याचाच दुसरा अर्थ महाराष्टातले सारे मागासवर्गीय हे कस्पटासारखे आहेत ते कितीही रडले,लढले अन मोर्चे काढले तरी कुणाचेच काहि बिघडत नाही त्यांच्या आयाबहिणींची जरी भर रस्त्यात आब्रु लुटली तरी शौभा डे,अण्णा हजारे,नाना पाटेकर,अमिर खान, राज ठाकरे,उध्दव ठाकरे,पंकजा मुढे,अंजली दालमिया,किरीट सोमय्या,शरद पवार वा तथाकथित समाजसेवक तोंडातुन ब्र सुध्दा काढणार नाहित की त्यावर लिहिणार वा चित्र रेखाटणार नाहित कारण या देशात बौध्द म्हणजे माणसे नसुन ती एक कस्पटे आहेत निर्जीव .त्यांना कुणी ही कसेही हका…!
ते काय त्याच्यातला एखादादुसरा गट उठेल मोर्चा काढतील अन गप्प गुमान घरी जावुन शांत होतील. पुन्हा कोणतरी असेच समजुन कृत्य करतील पुन्हा असेच येरे माझा मागले होतै .
म्हणजे बाजारात किंमत नसलेला टाकावु माल झालेला हा समाज….!असेच या माहाराष्टातील खालपासुन वरपर्यंत वाटत असते…आमच्यातिल सोमा-गोमांना सत्तेची व पैशाची पेंढ टाकली की आमची घोडे मोठी होतात व समाज मात्र किंमत नसलेला कचर्‍यात जमा होतो.

यावरून किंमत समजली नसल्यामुळे मुख्य आरोपीला अटक सोडा पण त्या संरक्षणही दिले जाते.
हा शुध्द फसवे पणा आहे केवळ संस्कृतीच्या गप्पा मारणे लोक जेव्हा असे मानवतेच्या राज्यात अमाणविय घडले तरी कुणालाच पर्वा नसते.

म्हणजेच काय महामानव डाॅ.बाबासाहेबांचा लढा आजही आहे तिथेच आहे त्यांचा जाती अंताचा लढा या महाराष्टात अजुनही तसुभरही पुढे लढला गेला नाहिय. जातियतेचे हे उग्र रूप तमाम शौषितांच्या विनाशाला कारणीभुत ठरणार आहे.o


भावानो हे थांबवायचे असेल तर आपली किंमत यांना समजली पाहीजे ….आणि अन्याय करणार्‍या अन कस्पाटाप्रमाणे माणनार्‍या ह्या तथाकथितांना त्यांची जागा दाखवली पाहिजे तरच या घोडा बाजारात ….मानाची न अस्तित्वाची जाणिव होईल.

आपआपसात होणार्‍या गटबाजीला अन पक्षांतिल अविश्वासाला आता थांबवले पाहिजे अन सर्वांनी अस्तित्वासाठी महामानवांच्या महान स्वप्नासाठी सर्वांनी एक होवुन लढले पाहिजे….!
आपले लक्ष हे केवळ सत्ता नसावे सत्तेला वाकवणारे करारी व निर्णायक अस्तित्व असले पाहिजे त्यासाठी लढले पाहिजे.

मग याल ना आपल्या अस्तित्वा साठी…..
महामानवांच्या स्वप्नासाठी एल्गार मौर्च्याला……!
—प्रराजा
www.ambedkaree.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *