लढवय्या लोकांनी पाय का धरावे….?

लढवय्या लोकांनी पाय का धरावे….!

महामानवांचा आदर्श आपल्या रगारगात भरलाय.आम्ही आमचा वैचारिक बाप म्हणुन महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. त्यांच्या संघर्ष गाथाचे परायण ठता बसता करत असतो. जगलो तरी भीम वचनाने अन मेलो तरी भीम वचनाने …! कित्येक अस्थिर मनांना ,विचारांना अन धर्मवाद जातिवादात भरकटलेल्या अनेकांना त्यांच्या मानात जागृतीची आग पेरणारे हात जेव्हा अन्याय अत्याचारांसमोर लाचार होतात तेव्हा काय म्हणायचे.?

हे वैचारिक वारसा असलेल्या विचारधारेचा विजय,पराजय की सोइचे जगणे ? कणखर भुमिका सभासमेलनात असावीच पण ती आपल्या वैयक्तीक जगण्यात ही असावी.

ज्या बापाचे नाव घेतो तो कधीही स्वताच्या रक्षणासाठी,वा स्वतावरल्या अन्यायासाठी वाकला नाही प्रसगी लढला ,एकाकी पडला पण झुकला नाही…..!

लढवय्यांचे झुकणे व्यवस्थाला बळकटी देते अन हेच महामानवांचे अपयश …!कणखरपणे जगणार्‍या अनुयायांची कमी ,सोयीची तडजोड….!

प्रा. सुषमा ताईंवर परवा झालेला भ्याड हल्ला…!
त्यानंतर त्यांचे नाशिक रोडवर पोलिस स्टेशनला जावुन फिरर्याद नोंदवण्याचा प्रयत्न त्यानंतर त्यांच्याच संदर्भातील व्हायरल झालेला व्हिडियो…!
https://m.facebook.com/groups/488386721245797?view=permalink&id=1895354540549001

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1793475187339943&id=100000324369123

खरं तर हे न पटणार …शाहु फुलें आंबेडकरांचे वारसा सांगणार्‍या लढवय्या लोकांनी या मुर्डाडांचे पाय पकड्यापेक्षा त्याला कायद्याच्या कचाट्यात पकडवयास हवा होता. नाही घेतली तक्रार तर कायदेशीर लढाई लढता आली असती पण वैचारिक प्रबोधनाची जबाबदारी शीरावर घेतलेल्या सेनापतीन गयावया करणे म्हणजे त्यांना त्या वैचारीक विचाराचा पराभव वाटला का? अशा धेंडाना वटनीवर आणण्यासाठी कायदा पुरेसा नाहिय का? जर विचार जगवावयाचे असतील तर गयावया नको….कणखरपणाच हवा….!

अन्यथा म्हातारी मेल्याचं दुख नाही काळ मात्र सोकावतो…

आंबेडकरी चळवळीतला हाच कणखरपणा अशा मोक्याच्याच ठिकाणी कचरतो अन आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विश्वास उडतो…पुन्हा आमचा विचार सैराभैरा होतो अन मग आम्ही…..कुणाच्याही गढुळलेल्या तळ्यातले कमळ, झोपडीत झाडु ,बंगल्यात घड्याळ अन भवनात धनुष्य घेवुन स्थानापन्न होतो…..!

तळ टीप:
खणखरपणा हा आंबेडकरी बाणा आहे तो टिकवा अन्यथा व्यक्ती जगतील चळवळ संपेल……!
—प्रमोद रामचंद्र जाधव

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

"जो दिल के अच्छे होते हैं, दिमागवाले उनका जमकर फायदा उठाते हैं"

शनी मे 5 , 2018
Tweet it Pin it Email काही कोटेशन खूपच बोलके असतात. ते त्रिकालाबाधित संदेश देतात. “जो दिल के अच्छे होते हैं, दिमागवाले उनका जमकर फायदा उठाते हैं” हे त्यापैकीच एक कोटेशन. सध्या हे कोटेशन बौद्ध आणि सच्चा आंबेडकरवाद्यांना तंतोतंत लागू होत असल्याचे जाणवते. ‘जय भीम’ हा क्रांतिकारी मंत्र बौद्धांची जशी ताकद […]

YOU MAY LIKE ..