रत्नागिरीत ही वंचितांचा झंझावात…! परिवर्तन होणारच…!

वंचित बहुजन आघाडी चे कोकणात झंझावाती शक्ती प्रदर्शन

काल कोकणात विशेष रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचे केंद्र बिंदू असलेल्या सर्वात मोठ्या शहरात अर्थातच रत्नागिरीत काल व ब आघाडीचे प्रमुख अड प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीतीतीत पार पडली .

लाखोंची गर्दीत असलेल्या या सभेत आत्ता पर्यंत च्या कोकणातील सर्वात मोठ्या गर्दीच्या सभांचे रेकॉर्ड ब्रेक केले .

कोकणात खोती पद्धत,कुल कायदे, मायनिग आणि नागरी सुविधांवर या सभेत प्रकाश उपस्थित वक्त्यांनी टाकला .

कोकणातील खोती विरोधात लढा लढून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या बहुजनांच्या हक्काच्या जमिनी मिळऊन दिल्या आता त्यांचे नातू आणि कोकणचे सुपुत्र अड प्रकाश तथा बाळासाहेब आबेडकर इथल्या वंचितांना न्याय देण्यासाठीं सत्ता बदलासाठीं लढत आहेत त्यांना साथ द्या असे सर्वच वक्त्यांनी सांगितलें.

सर्वात प्रभावी भाषण झालें ते आघाडीच्या प्रवक्त्या मा दिशा पिंकी शेख यांचे त्या म्हणाल्या आज जरी महिला दिन असला तरी भारतीय महिलांचा 25 डिसेंबर हा खरा महिला दिन आहे कारण याच दिनी महाड येथील क्रांती भूमीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीं मनुस्मृती जाळली आणि इथल्या महिलांना दास्य मुक्त केले .

इथल्या लोकानी कुणालाही घाबरायचे नाही व घाबरू न जाता बिनधास्तपणे आपल्या लोक संसदेत पाठवा कारण इथले राजकारण्यांनी केवळ वापर केलाय . विस्थापित निधीचे काय झाले .इथल्या मोठ्या प्रकल्पातुन विस्थापित झालेल्या लोकांचे काय झालें .हे कोणालाच माहीत नाहीं.

कोकणातील आरोग्य सुविधांचा,शिक्षणाचा आणि रोजगाराचा व दळण वळणाचा अभाव असल्याने त्याच्या वर वंचित बहुजन आघाडीचा पर्याय आहे असे त्या म्हणाल्या .
अड प्रकाश आबेडकर यांनीं इथल्या विस्थापित जमीन आणि मायनिवरील प्रकरणावर बोलताना कोकणाला कसे ओरबाडून काढले हे उदाहरणासाहित सांगितलें.

कोकणात सर्वात मोठीं सभा पाहून नव्याने बदल घडेल असे जणू लागले आहे .
-पराग चंद्रकांत जाधव
रत्नागिरी
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *