येणारे युग” हे “आंबेडकरी युग” आहे ,आता उशीर नको .

काल पर्यन्त रिपब्लिकन नेत्यांना कॉंग्रेस ऑफिस बाहेर उभं राहावं लागतं होत.आज आदरणीय बाळासाहेबांच्या एका प्रयोगाने महाराष्ट्राचे दोन्ही काँग्रेस राजगृहाच्या दारात उभे आहेत…म्हणून सांगतोय आपलं अस्तित्व दाखवण्याची वेळ आली.संसदेवर निळा फडकवण्याची वेळ झाली…!
चुन लो भाई एक ही लीडर..
फिरसे आंबेडकर ,प्रकाश आंबेडकर..
माझं मत वंचित बहुजन आघाडीलाच..
माझं मत माझ्या अस्तित्वसाठी लढणाऱ्या बाळासाहेबांना..!

होय ही #प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य आंबेडकरी जनतेची .तमाम राजकीय पक्षांनी आंबेडकरी समूहाची अशी गेल्या चाळीस वर्षात कातून ठेवली होती .सत्तेच्या नादात आंबेडकरी नेतृत्वाचा गैरवापर करणे आणि त्यांना सतत पद आणि खुर्चीचे अमिश देऊन परावलंबी करून नेहमी तोडा फोडा आणि राज करा अशी स्थिती निर्माण करून आंबेडकरी अस्तिवच संपवण्याचा कुटील डाव एका चाणाक्ष नेत्यामुळे हणून पाडण्यात आलाय.
कधी ही राजगृहकडे न फिरकणारे लोक आज ऐतिहासिक राजगृहाच्या वाटेवर दिसू लागलेत .
ज्या #राजगृहात जगातला सर्वात वंदनीय महामानव रमला ,हसला आणि लढला त्या राजगृह कित्येकदा दुर्लक्षित झाले होते आज पुन्हा एकदा ते राजगृह राजकारण आणि समाजकारण याचे केंद्रबिंदू बनत आहे .

जनतेच्या रेट्यामुळे ते अधिक वेगाने होत आहे आंबेडकरी जनतेने आता आपला नेता निवडला आहे .हे निर्विवाद सिद्ध होत आहे .तमाम बहुजनांचे नेते पद आता #आद अड #प्रकाश तथा #बाळासाहेब #आंबेडकर यांच्याकडे महाराष्ट पाहत आहे .या धुरंधर नेत्याने आता स्वतःला आतून बाहेरून सिद्ध केलंय.

#उन्हाच्या #लाहीत ,#गारठ्याच्या #गोठणार्या #थंडीत आणि धो धो वाहनाऱ्या #पावसाच्या वादळवाऱ्यात .अनवाणी,पायी, आणि कित्येकदा एकाकी झुंज दिली प्रसंगी अनेक #बोचऱ्या #टीकेचा #धनी होत तर कधी #हट्टीपणा चा #कळस करीत .

आता आणखीन परिक्षा नकोत आपल्यातील राहुट्या आत्ता ना बोलता बध कराव्यात आणि सर्वानी मोठ्या मनाने बाळासाहेबांचे नेतृत्व मान्य करावे निदान त्यांना तशी संधी ध्यावी . आपल्यातील एकीने संपूर्ण महाराष्ट्रातिल चित्र बदलेल आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची शासनकर्ती जमात बनेल.

आज दोन्ही काँग्रेसचे नेते आले उद्या आणखीन कोणीही येईल .येऊंद्या पण निर्णय माझ्या बा भीमाच्या लेकाचा असेल .

#आपल्यातील लोकांनी आत्ता आपआपसातील हेवेदावे विसरा आणि एक व्हा ही काळाची आणि जनतेची मागणी आहे हेच मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या जनतेची मागणी आहे. आंबेडकरी समूहातील राजकीय धुरंधरानो समजून घ्या येणार काळ ही हीच मागणी करीत आहे येणारे #”युग” हे #”आंबेडकरी युग” आहे . आता उशीर नको .
-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *