मावळलोकसभा क्षेत्रातल्या वंचितांचा नेता म्हणून मा. #राजारामपाटील यांनाच निवडून द्यावं !!!

मावळलोकसभा क्षेत्रातल्या बौद्धांनी आणि वंचित घटकांनी आपला नेता म्हणून मा.राजारामपाटील यांनाच निवडून द्यावं !!!

होय त्याच कारण ही तितकंच योग्य आणि तर्कसंगत आहे.
मागच्याच आठवड्यात म्हणजेच 21 आणि 22 मार्च 1920 ला, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भरवलेल्या माणगाव परिषदेला नव्वदी पूर्ण होऊन शताब्दी वर्षाकडे आपण वाटचाल करतोय.
त्याच परिषदेच्या अनुषंगाने काही गोष्टी अधोरेखित केल्या पाहिजेत त्या म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून राजर्षी शाहू महाराजांना बोलावले होते आणि याच परिषदेत,शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्याच उपेक्षित वंचित आणि बहुजन समाजाचे नेतृत्व करावे
असे सांगून शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःसकट सगळ्या बहुजन समाजाचा नेता घोषित केले होते.

असा हा दूरदर्शी आणि सत्यशोधक चळवळीचा वैचारिक वारसा घेतलेला खरा खुरा सत्यशोधक शाहू राजा.

खरतर याच परिषदेत शाहू राजे officially De caste झाले असे आपण समजले पाहिजे. आणि खरीखुरी जातीअंताची चळवळ माणगाव परिषदेपासून सुरू झाली असे मानायला काहीही हरकत नसावी.

सांगायचा मुद्दा इतकाच की,आज नव्वद वर्षांनी काळ 360 च्या कोनात कसा फिरलाय,

ज्या शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपला नेता घोषित केल
आणि त्याच फुले, शाहू आणि आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या,

आगरी, कोळी आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राजाराम पाटलांना मावळ लोकसभा क्षेत्रातल्या बौद्धांनी आपला राजकीय नेता म्हणून पुढे आणावं हा केवळ आणि केवळ महापुरुषांच्या विचारधारेचा विजय आहे असे मी समजतो.

आणि म्हणून मावळ लोकसभा क्षेत्रातील बौद्धांनी,बुद्धाचा, धम्माचा आणि जातीअंत चळवळीचा खराखुरा शिलेदार म्हणून मा. राजाराम पाटील यांना निवडणुकीच्या निमित्ताने का होईना आपला वैचारिक सामाजिक आणि सांस्कृतिक नेता म्हणून मान्यता द्यायला काहीच हरकत नसावी.

कारण राजाराम पाटिल यांचं गेल्या 2 दशकातल आंबेडकरी आणि पुरोगामी चळवळीतील योगदान हे आपण सगळेच जाणतो इतकंच नाही तर ते मानतो सुद्धा,

आगरी जातीत जन्मून De Caste होणं किती कठीण आहे हे आपण जाणतोच पण हा मानूस इतक्यावरच थांबत नाही तर तो आई एकविरेला बुद्धाची आई महामाया समजतो त्याचा संस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आणि पुरावा आगऱ्या कोळ्यांना समजावून सांगतो,
(इथे दुसऱ्या जातीचे येऊन बौद्धांनाच चळवळीचे ढोस पाजणारे खोऱ्याने आहेत)
पण हा माणूस आपल्या समाजात जाऊन तिथे लोकांना तयार करतो हे बाब अतिशय महत्त्वाची आणि अधोरेखित करण्यासारखी आहे.

बौद्ध लेणीच्या संदर्भातली मा. राजाराम पाटील यांची भूमिका, संशोधन आणि आंदोलन सर्वश्रुत आहेच, लेणींचं संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावणारा हा प्रचंड बलाढ्य माणूस आहेच.

अस असलं तरी हा व्यक्ती बामसेफ सारखा नुकतेच वैचारिक ढोसवर ढोस देणारा नाहीये,माणसाला जगण्याला विचार महत्वाचे आहेतच पण त्याच सोबत त्याच्या इतरही गरजा ही आहेत हे समजून घेणारा हा Prcticle विचारवंत आहे.

कार्यकर्त्याला खाली पेट काही करता येत नाहीच,
नुसत्याच विचारांनी क्रांती होत नसते तर त्यासाठी आधी पोटाला अन्न लागत,
मग ज्या व्यक्ती आणि समाजाला बदलायचं आहे त्याच्याशी बुद्धाने सांगितलेली मंगल मैत्री, आणि मग नंतर विचार पेरण्याचं काम हा अवलिया करतो,
म्हणूनच तो खराखुरा बुद्धाचा आणि बुद्धाच्या विचारांचा अनुयायी आहे असे मी समजतो.

वंचितानो आणि बौद्धांनी ,
आपल्याला ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध म्हणून जागतिक पातळीवर आपली ओळख आणि अस्मिता निर्माण करून आपल्याला जगाशी मैत्री करून जोडलं,जगाशी आपलं एक मैत्रीचं, करुणेच, प्रज्ञेच नात निर्माण करून दिल.

त्याच जागतिक पारिप्रेक्षातील, भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या एका छोट्या का होईना पण आगरी, कोळी आणि ओबीसी समूहाचा नेता म्हणून मा. राजाराम पाटील जर त्यांच्या समूहाला बुद्धाशी, प्रज्ञेशी, मैत्रीशी, करुणेशी ओळख करून देऊन त्याना धम्मदेसना देत असतील तर ते आपले धम्मबंधू आहेत

अश्या चारित्र्यवान, प्रज्ञावंत, धम्मबंधूंना आपण आपला नेता म्हणून, आपली नैतिक, धार्मिक जबाबदारी म्हणून, मावळ लोकसभा मतदार संघातून मताधिक्याने विजजी करावे असे आव्हान चळवळीतील कार्यकर्ते करत आहेत.

सभार : मा.राजाराम पाटील यांच्या FB वॉल वरून

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *