मानव मुक्ती दिवस अर्थात चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिन…

  • आज २० मार्च….! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेला मानवमुक्तीचा अर्थात पाण्याचा लढा…! चवदार तळ्याचा सत्याग्रह या लढ्यानेच सार्‍या जगाचे लक्ष केंद्रित करुन मानवी हक्कांचा लढा जागतीक पातळीवर नेवुन या देशातील हजारो पिढ्यांची गुलामगीरी विरूध्द विद्रोह केला. आपल्या लाखो अनुयायांसमवेत कुलाबा जिल्हा आताचा रायगड – महाड मुक्कामी चवदार तळ्याच्या काठावर मानवमुक्तिचा लढा तिव्र केला. मानवी स्वातंत्र्यच का ?

  • होय खर्‍या अर्थाने मानव मुक्ती हजारो वर्ष अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणीच्या पाणी पिण्यास बंदी होती.त्यांच्या स्पर्षाने पाणी बाटले जाते.मात्र गाई ,गुरे अन तत्सम प्राण्याने तेच पाणी प्याले तरी चालते त्या पाण्यात प्राण्याची विष्ठा कालवली तरी चालते मात्र त्याच पाण्याला जरी अस्पृश्य म्हणजेच त्यावेळचे महार यांनी स्पर्श केला तरीही बाटते . हे अजब धर्म षडयंत्र मानवाच्या मुलभुत अधिकाराला रोकते,अन्याय करते आणि मुलभुल शारिरीक गरज भागवीण्यास रोकते अर्थात अशा प्रकारच्या समाजव्यस्थेविरूध्द अन त्या समाज व्यवस्थेला निर्माण करणार्‍या धर्म व्यवस्थेविरूध्द दंड थोपटुन आपल्या लाखो अनुयायांसोबत चवदार तळे खुले केले खर्‍या अर्थाने मानसाच्या मुलभुत अधिकार मिळवुन देवुन समता अन स्वातंत्र बहाल केले तो दिवस म्हणजेच २०मार्च १९२७ खर्‍या अर्थाने मानवी स्वातंत्र्य बहाल करणारा दिवस या क्रांती दिनी या लढ्यात लढलेल्या ज्ञात अज्ञांत सर्व सत्याग्रहींना अन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन….! www.ambedkaree.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *