महामानव विश्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ ते ६ डिसेंबर १९५६) युगंधर…….!

महामानव विश्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ ते ६ डिसेंबर १९५६),डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जातात .डॉ.आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, अस्पृश्य आणि वंचित समाजाला राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी अस्पृश्य लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील सर्वोच्च उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. डॉ .आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.

डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर जन्म तारीख एप्रिल १४, इ.स.१८९१
महू ताथा डॉ. आंबेडकर नगर आणि महापरिनिर्वाण तारीख डिसेंबर ६, इ.स. १९५६ अकबर अली रोड दिल्लीत झाले ,
विश्वविख्यात अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी,निबंधकार, जगविख्यात वकील ,कायदेपंडित,समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ (Anthropologist),उच्चकोटीचे शिक्षणशास्त्रज्ञ (Pedagogue),निर्भीड संपादक (Editor,) लेखक,तत्वज्ञानी,थोर समाजसुधारक (Social reformer),पत्रकार,समाज क्रांतिकारक (Revolutionary),प्राध्यापक,निष्णात राज्यशास्त्रज्ञ (Political Scientist),प्रकांड पंडित (Erudite),प्रभावी वक्ता (Orator)स्वातंत्र्य सेनानी,इतिहासकार,जगप्रसिद्ध संविधान निर्माता( Constitutionalist),वृत्तपत्र संपादक,नागरी हक्क वकील,मानवतावादी आशा अनेक नामांकांने जगमान्य असणारे महामानव बाबासाहेब ताथा डॉ भीमराव आंबेडकर .

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *