महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगरक्षकांचा सन्मान..…!-दि.एम.एम.ससाळेकर यांचे नाव परळच्या रस्त्याला.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही निवडक अंगरक्षकांपैकी एक असलेले व बौद्धजन पंचायत समिती, समता सैनिक दलातील प्रमुख कार्यकर्ते आणि आपल्या कार्याने ठसा उमठावणारे व्यक्तिमत्त्व असलेले कोकणातील राजापूर तालुका येथील राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्रमांक-११ मधील ससाळे गावचे दि. मालोजी मावजी तथा एम एम ससाळेकर . यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदान मुंबई कारांच्या स्मरणात रहावे या करीता राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे सतत पाठपुरावा केल्याने मुंबई महानगर पालिकेने त्यांचे नाव परळ येथील आईमे मेरपणजी मार्ग आणि परमार गुरुजी मार्ग या दोन रस्त्याना छेद देणाऱ्या अर्थात क्रॉस लेन ला देण्याचा ठराव गेल्या वर्षी पारित केला होता त्या क्रॉस लेन ला एम एम ससाळेकर मार्ग असे नामाभिधान करण्याचा कार्यक्रम राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई यांनी नामकरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच एम एम ससाळेकर यांच्या जीवनावर जीवनगौरव ग्रंथ संघाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असून त्या निमित्ताने सभेचे ही आयोजन सन्मानीय संघाच्या वतीने करण्यात येणार आहे .

गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई ही राजापूर कर मुंबई स्थितवासीयांची मातृसंघटना असून त्याच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा म्हणून संघाच्या वतीने सतत पाठपुरावा केला जात होता या बाबीचा मुंबई महानगर पालिकेने याचा विचार करून अखेर त्याला मंजुरी दिली .

या सोहळा दिनांक ९ जानेवारी २०१९ ला ठिक संध्या ६.०० वा शिरोडकर हॉल परळ येथे आयोजित केला असून या कार्यक्रमात विभागातील आमदार मा.अजय चौधरी ,मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा. यशवंत जाधव ,स्थानिक नगरसेविका सिंधुताई मसुरकर आणि मा. रमाकांत यादव जी माजी उपप्राचार्य सिद्धार्थ कॉलेज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .तद प्रसंगी विशेष अतिथी म्हणून मा जयेंद्र जाधव बी डी ओ देवरुख आणि मा शरद कांबळे माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत . सदर मंगलमय सोहळा राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई चे अध्यक्ष मा. शिवराम हरळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

वरील कार्यक्रमाला राजापूर आणि लांजा तालुकावासीय तसेच मुंबईतील सर्व बौद्ध समाजाने मोठ्या प्रमाणात हजर राहावे असे निमंत्रण राजापूर तालुका बौद्धजन संघाच्या समन्वय समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

– किरण तांबे ,बदलापूर – उपाध्यक्ष – रा.ता.बौ.गट क्रमांक -११

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *