महाड सत्याग्रह….निमित्त…!

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जेष्ठ सहकारी दि.संभाजी तथा दादासाहेब गायकवाड यांचे चरित्र

निमित्त…..
महाड सत्याग्रह आणि कोकणातील लढवय्ये भीम अनुयायी…!

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे सतत कार्यकर्त्ये आणि लढवय्या लोकांचा भरणा असायचा सतत ते समाजासाठी जागृत असायचे.त्यांच्या ह्या स्वभावरुन असंख्य कार्यकर्त्ये निर्माण होवु लागले. कोकणातील सोमवंशीय महारांतील गोपाल बाबा वलगणकर हे पहिले मोठे नेते.त्यांनी महांरांना सैन्यात भरती करावी म्हणुन प्रयत्न केले. कोकणातील बरेच महार समाजाचे लोक एकत्र राहयचे.बाबासाहेंबांच्या अगोदर पासुन लहान सान प्रकारे समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडणे यांवर या लोकांचा भर असे मात्र त्यात बरेच यश यायचे नाही समाज अज्ञानी होता व समाजासाठी काम करणारे नेते प्रभावी मोजकेच व वयस्कर होते .
पुढे बरेच लोक बाबासाहेबांचा प्रभावाखाली आले बाबासाहेबांचा कायद्याचा अभ्यास .अंग्रेजी भाषेवरचे अफाट प्रभुत्व अन प्रश्नाला भिडण्याची चिखाटी वाखाणण्यासारखी होती पर्यायी फार कमी वेळात बाबासाहेब संपुर्ण समाजाचे ऐकमेव जागतीक किर्तीचे कायदेतज्ञ नेते झाले.
महामानवांना त्यांच्या काळात ज्या लोकांनी सहकार्य आणि पाठबळ दिले ते त्यावेळच्या या महार नेत्यानी अन कार्यकर्त्यांनी त्यांनी आपण होवु आपला नवा नेता स्विकारला…!
महाडच्या सत्याग्रहाला लागणारी मदत तिथली  पहाणारे महाडचे दादासाहेब गायकवाड अर्थात संभाजी तुकारााम गायकवााड हे त्यापैकी एक त्यांचा मुलगा मारहाणीत म्यृत्युमुखी पडला .

मुंबईतल्या भाष्य प्रकाशनाने यांच्यावर काही वर्षापुर्वी Building The Ambedkar Revolution -Sambhaji Tukaram Gaikawad and Konkan Dalit  हे पुस्तक प्रकाशित केले . या पुस्तकात त्या काळातल्या सच्चा आंबेडकरी कार्यकर्त्यांची माहीती उपलब्ध केलीय.
इंग्रजीत असलेले हे पुस्तक महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह अन मनुस्मृती दहन या ऐतिहासिक घटनाचा दस्तऐवज आहे. अभ्यासकांना हे पुस्तक संग्रही नक्कीच ठेवावे.
महेश भारती -भाष्य प्रकाशन यांकडे आपण संपर्क करु शकता.

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *