भीमा कोरेगाव विजय दिनी महाराष्ट्रात तणावपुर्वक शांतता ..! – लाखो बौद्ध विजय भूमीवर..!

भीमा कोरेगाव विजय दिनी महाराष्ट्रात तणावपुर्वक शांतता ..….!
1818 मध्ये ब्रिटीश सैन्यातील महार रेजिमेंट ने जिंकलेल्या ऐतिहासिक लढाईच्या ऐतिहासिक दिनी १ जानेवारी रोजी लाखो बौद्ध लोक एकत्र येतात .

दुसरा बाजीरा यांच्या शासनकाळात पेशव्यांचे शासन मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैनिक होते. परंतु त्या सैनिकांना हिंनतेची ,अपमानाची आणि अन्यायाची वागणूक मिळे, त्यांचा स्पर्शाने ,सावलीने धर्माची विटंबना होते म्हणून त्यांना कमालीची अत्यंत घाणेरडी वागणूक मिळत असे संपुर्ण अस्पृश्य समाजाला पेशव्यांच्या काळात सावली ,स्पर्श यांचा विटाळ होत असे म्हणू न महार समाजाला गावाच्या बाहेर ,त्यांचे सर्व हक्क ,अधिकार काढून केवळ या समाजाने मनुस्मृती त लिहिल्या प्रमाणे सर्वांची सेवा करावी व आपले हिंनेतेची जीवन जगावे अशी बंदी लादण्यात आली होती त्यावरच पेशवे थांबले नव्हते तर अमानुष अत्याचाराची हद्द म्हणजे महार समाजातील लोकांची पावले जमिनीवर दिसू नये आणि त्यांनी कुढेही थुंकू नये म्हणून त्यांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधणे बंधन कारक केले .

इतका अमानुष अत्याचार आणि कडक निर्बंध पेशव्यांनी या महार समाजावर केले पेशवाईच्या उतरत्या काळा त व इंग्रजांच्या सैन्याशी जर लढायचे असेल तर आमच्या समाजावर जे निर्बंध लादले आहेत ते बंद करा या मागणी शूर वीर सिंदनाक महार यांनी पेशव्यांकडे केली असता त्यांना अत्यंत हिंनतेने आणि अहंकाराने पेशव्यांनी उत्तर दिले व तुमचा धर्म आमची सेवा व चाकरी करण्याचा आहे तुम्हाला आमच्या साठी लढावे लागेल त्या बदल्यात काहीच मिळणार नाही तो तुमचा अधिकार नाही असे बोलल्याने वीर सिद्धांनाक यांना कमालीचा संताप आला आणि त्यांनी स्वाभिमान सर्व सैनिकना याची कल्पना दिली आणि इंग्रजांशी बोलणी केली व त्यात या शूर सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून पेशव्यांच्या हजारो सैन्याची धूळधाण करीत ……विजय प्राप्त केला.

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध, ज्यामधे भीम कोरेगावचा एक भाग होता, महार समुदायाने आपल्या अन्यायाच्या बदल्यात ब्रिटिशांना त्यांचे शासन स्थापन करण्यास मदत केली आणि जुलमी पेशव्यांच्या सत्तेची खालसा करण्यात मदत केली.

ही लढाई पेशव्यांच्या अन्यायी अस्पृश्यतेविरूद्ध संघर्ष करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

दरवर्षी पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध लाखो लोक या विजय दिनाचे औचित्य साधून त्या वीरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ही इथे येत असत त्यांचा आदर्श घेत लाखो लोक येत असतात त्याचा पूर्वी स्थानिक लोकांना उत्साह व अभिमान वाटत असे मात्र गेल्यावर्षी घडलेल्या जातीय दंगलीचा परिणाम व या वर्षी कडक बंदोबस्त त्यामुळे स्थानिक लोकांत तानावपूर्वक शांतात
जनावत आहे .कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन काळजी घेई आहे .
प्रमोद रा जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *