भिडे गुरुजींच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या गेट जवळ आत्मदहनाचा प्रयत्न

भिडे गुरुजींच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या गेट जवळ आत्मदहनाचा प्रयत्न

रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता गणेश पवार पोलीसांच्या ताब्यात

मुंबई : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या गणेश पवार नावाच्या कार्यकर्त्याने आज दुपारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळ अंगावर राॅकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कर्तव्यावर असणा-या पोलिसांनी गणेश पवारला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

दुपारच्या सुमारास गणेश पवार मंत्रालयासमोरील मुख्य प्रवेद्वाराजवळ आला आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा अशी मागणी करत छोट्या कॅन मध्ये आणलेले राॅकेल अंगावर ओतून घेतले.हा प्रकार सुरू असतानाच उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने गणेश पवारच्या दिशेने धाव घेत त्याला ताब्यात घेतले. गणेश पवार हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचा रहिवासी आहे. तो रिपब्लिकन सेना या संघटनेचा कार्यकर्ता आहे.पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आर्थिक चळवळीला नवी दिशा. ......चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया,

गुरू मे 3 , 2018
Tweet it Pin it Email आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया, आत वेळ आली आहे उद्योगधंदे उभारून ह्या देशाच्या आर्थिक शक्तीत नाहीरे वर्गाचा सहभाग वाढिवण्याचा. हाच संदेश समाजात पसरवण्यासाठी आणि उद्दिष्टपूर्ती साठी शाक्य एनर्जी प्रा.ली ,अस्मिता आणि एव्हान्स कमर्शियल एंपायर प्रा. लि टीमने सध्या मुंबई, कोकण आणि […]

YOU MAY LIKE ..