बौद्ध साहित्यिक आणि  नाट्यकार प्रेमानंद गज्वी यांची ९९ व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी वैचारिक वारसा सांगणारे ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. ९८ व्या संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावं चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नाटककार प्रेमानंद गज्वी हे आंबेडकरी आणि बुद्धिस्ट वैचारिक वरसा मांडणारे मराठीतील प्रतियश लेखक आहेत त्यांच्या बऱ्याच नाट्यकृती ह्या मानवतेच्या आणि समतेच्या लढ्याला प्रोत्साहित करणाऱ्या आणि त्यांचे प्रखरपणे मांडणी करणाऱ्या आहेत त्यातील तंण मजोरी, किरवंत सारख्या गाजलेल्या कलाकृती आहेत .
सतत आंबेडकर वादाचे आणि विचारांचे पुरस्ककर्ते असणारे आंबेडकरी चळवळीतील एक जेष्ठ नाटककार असून त्यांच्या बोधी नाट्य कला अकादमी मधून ही ते नवोदितांना मार्गदर्शन करीत असतात. गज्वीना मिळालेल्या या मनाचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे .नाटककार प्रेमानंद गज्वी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत.
यंदाच्या नाट्य संमेलनाचे ठिकाण अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच त्याचादेखील घोषणा केली जाणार आहे. नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *