बीएसपीचा दोगलेपणा…..! 1द्वेषाची भावना …!

बीएसपीचा दोगलेपणा

उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पक्ष व समाजवादी पक्ष
अर्थात बीएसपी आणि सपाची युती झाली आहे. या युती मध्ये कॉंग्रेस पक्ष सामिल नाही. तरी सुध्दा अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी,राहुल गांधी यांना बीएसपीने जाहीर पाठिंबा दिला आहे.कॉंग्रेसशी युती नसूनही त्यांच्या विरोधात पक्षाचा उमेदवार देणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे.

त्याउलट महाराष्ट्रात बीएसपीने सर्वच्या सर्व 48 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातुन अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात बीएसपीने उमेदवार उभे केले आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर व तत्कालीन गांधी नेहरूंच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय धोरणाबाबत प्रचंड विसंगती होती.सोबतच डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा जेंव्हा निवडणूकीत उभे राहिले तेंव्हा तेंव्हा कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचा उमेदवार देऊन बाबासाहेबांना पराभूत केले होते.प्रसंगी कॉंग्रेसने बाबासाहेबांच्या चळवळीतील कार्यकर्ते फोडून त्यांना बाबासाहेबांच्या विरोधात निवडणूकीत प्रतिस्पर्धी बनवून त्यांच्या पाठीशी धनशक्ती उभी केली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केले.

अशा कॉंग्रेसच्या गांधी नेहरू घराण्यातील सोनिया गांधी व राहुल गांधी यांना बीएसपीने आता विनाअट पाठिंबा दिला आहे.मात्र बीएसपी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालते असे म्हणणाऱ्या बीएसपीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उभा करणे कितपत योग्य आहे ?असा प्रश्न सर्वदूर विचारण्यात येत आहे.

अॅॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात त्यांना पराभूत करण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या मतांचे विभाजन आणि धृविकरणासाठी बीएसपीची रणनीती आहे. मनूवाद्यांशी लढण्या ऐवजी आंबेडकरी चळवळीच्या नेत्या विरोधात बीएसपी मैदानात उतरली आहे. दरवेळेस अकोल्यात अॅॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बीएसपी उमेदवार उभे करते.जाणीवपूर्वक बौध्द समाजातीलच उमेदवार उभा करण्यात येतो.मात्र या उमेदवारास अतिशय शेकड्यात नगण्य अशी मते पडतात.तरी सुद्धा बीएसपी आपली हेकडी कायम ठेवते.अलिकडच्या काळात तर महाराष्ट्रात आंबेडकरी समूहासह ओबीसी, आदिवासी, मुस्लिम अल्पसंख्याक समूहाचा बाळासाहेब आंबेडकरांना ऐतिहासिक जनाधार वाढला आहे. अशा परिस्थितीत बीएसपीचा दोगलेपणा सर्वांनाच खटकणारा आहे.
सुरेश शिरसाट
सभार सुरेश शिरसाट यांच्या FB wall वरून

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *