प्रा जोगेंद्र कवाडेंचा कोंकण दौरा आणि त्यांनी कोकणातील विकासासाठी दिला निधी.

स्वातंत्र्य नंतर ही कोकणात अजूनही पाण्यासाठी झगडावे लागते.स्थानिक आमदारांचा दुर्लक्ष विधानसभेचे आमदार आणि आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी विकासाला दिलीं गती.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे दिनांक २६ व २७ जानेवारी रोजी कोकण दौर्यावर असून राजापूर तालुक्यातील निखरे गावातील कपिलवस्तू वाडीच्या विहीरीच्या बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. अध्यक्ष स्थानी बौद्ध तरूण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष रविंद्र यशवंत तांबे आहेत.
रविवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. ५६ अंतर्गत भातगाव बौद्ध वाडी येथील संरक्षक भिंतीचे उद्घाटन प्रा. कवाडे सर यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी १२ वाजता मौजे असोरे येथील रस्त्याच्या डांबरी करणाच्या कामाचा शुभारंभ देखील प्रा कवाडे सरांच्या हस्ते होणार आहे.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद अनंत सुर्वे आणि विभाग क्रमांक २०८ चे अध्यक्ष प्रविण जाधव यांचीही या कार्यक्रमाना प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रा. कवाडेसरानी आपल्या आमदार निधीतून या कामाना निधी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती जेष्ठ आंबेडकरी पत्रकार मा मिलिंद तांबे यांनी दिली .
-किरण तांबे
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *