प्रासंगिक-कल्याणच्या दौरा आणि मराठीतील भाषण…..!

मा.पंतप्रधनांचे भाषण आणि आर एस एस वाल्यांचा मीडिया कौतुक करतो मोदी मराठीतुन बोलले ……!.

मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधानांनी यावं आणि त्या प्रकल्पाचे भूमिपूजन करावे हे अपेक्षित होते कारण कल्याण -डोंबिवलीत – ठाण्यात ज्या प्रकारे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे जाळे आहे त्या प्रकारचे जाळे कुठेही नसेल मात्र तरीही इथला नागरिक सुखात जगात नाही तो एकतर रेल्वेच्या गर्दीत आणि वाढणाऱ्या बेसुमार नागरीकरणाच्या भोवऱ्यात अडकला आहे आणि सतत विविध घोषणाबाजी होऊन ही कोणताच प्रकल्प इथे शहराच्या भल्यासाठी राबवला जात नाही त्यामुळेच इथला पारंपरिक मतदार नाराज आहे ही नाराजी दुर व्हावी आणि पून्हा एकदा मताचा जोगवा मागाता यावा यासाठी सत्ताधाऱ्यानी थेट पंतप्रधानांना साकडं घालून भूमीपूजनाचा मुहूर्त निवडणूक आचारसंहिता लागू होण्या अगोदर उरकून घेतला .

देशाचे पंतप्रधान येणार म्हणून कधीही झाडू न लागलेल्या भागातून चकाचक झाडू फिरवला गेला जिथे कधीही खड्डे बुजावले जात नाहींत ते भरले गेले आणि कधी ही रंगरंगोटी केली नाही त्या रस्त्यावर रंगरंगोटी करून चक्क स्थानिक लोकांना आपण एका दिवसात मुबईत आलो की काय वाटू लागले .

पिंढ्या पिढ्यांचा रस्ता दुरुस्त झाला आणि रस्त्याच्या विभाजकवर हिरवीगार झाडे डोलू लागली .

सतत ट्राफिक आणि अपघाताने त्रस्त असणारा रस्ता खाली आणि मोकळा दिसला कधीही पोलीस शोधुन सापडत नाहीत त्या भागात चौकाचौकात पोलिसांच्या ताफा पाहून लोकांना अख्या महाराष्ट्रातील पोलीस बघितलयाचे सुख मिळाले .

ऐतिहासिक भूमीपुजनांच्या हाकेवर असणारे डंपिंग ग्राऊंड आणि तेथून निघणारा कोंदड धूर आज अचनाक नाहीसा झाला.

पंतप्रधान आले भूमिपूजन केले मराठीतून बोलले आपण भारावून गेलो पण पंतप्रधान येणार म्हणून केले ते काम जर सामान्य जणांसाठी अगोदर सत्ताधार्यानी केले असते तर …..?

कित्येक घरातील तरूण पोरे दगावली नसती ,कुणी श्वसनाचे आजाराने संपला नसता की पोलीस नसल्याने चोरी झाल्याची कित्येक प्रकारणे कल्याणच्या पोलीस ठाण्यात खितपत पडली नसती .

पंतप्रधानांनी मराठीत बोलले कारण ते मराठीतुन आर एस एस मध्ये असतांना शिकले ,त्यांचे मार्गदर्शक गुरुजी संभाजी भिडे सारखे बरेच लोक होते ,बरेच कल्याणकर त्यांचे सघोई होते म्हणून ते न चुकता मराठीत बोलले .त्यांचे कौतुक पण इथला राजा करतो काय …..प्रजा उपाशीच आहे ….!

तेव्हा उपाय केला तर ठीक नाहीतर कल्याण जाऊ नये या साठी बापगाव मार्गे कल्याण ते दिल्ली दौरा .कल्याणच्या बाहेरून केला गेला. तुर्तास असेच वाटले .

-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *