नरभक्षक “अवनी”ला केले ठार-

अवनी, मूर्ख होतीस तू. मी म्हणते, राहायचंच कशाला त्या जंगलात? जंगल हे काय घर असतं? तुझ्यासाठी असेल गं वेडे, पण आमच्यासाठी तो स्रोत असतो. लाकडाचा, खनिजांचा, साधनसंपत्तीचा. अगं हो, तुझं घर असेल ते, पण पहिला हक्क माणसांचा होता ना त्यावर. अवनी नावाची एक वाघीण, तिचे दोन बछडे तिथे राहतात याच्याशी त्यांना का असेल देणंघेणं? मी तर म्हणेन, नसलंच पाहिजे. माणूस जगला पाहिजे. अवनी मेली तर काय फरक पडतोय? त्यात तू तर 13 लोकांना मारलेली नरभक्षक वाघीण! माणसाच्या रक्ताला चटावलेली…
काय म्हणतेस? तू नाही मारलंस कोणाला? चल, खोटं नको बोलूस. आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट ओरडून ओरडून सांगतंय तसं. खोटं कसं असेल ते? हां, आता पुरावे नाहीयेत त्यांच्याकडे त्या सगळ्यांना, rather त्यातल्या कुणालाच नक्की तू मारलंस हे सिद्ध करायला, पण म्हणून काय झालं? त्यात तू अंगावर गेलीस त्यांच्या, त्यांनी spot केलं तुला तेव्हां. काय म्हणून? तुझ्या घरात घुसले, तुझ्यावर पाळत ठेवली, तुला ‘जेरबंद'(???) करायचा प्रयत्न केला म्हणून सरळ aggressive होतेस तू अवनी?नरभक्षक कुठली!
हो, पण एक आहे हं. त्यांना तुला मारायचं नव्हतं अगं. फक्त बेशुद्ध करून दुसरीकडे shift करायचं होतं. अर्थात, तुझ्यासारख्या नरभक्षक वाघिणीशी deal करत होते ते, आणला असेल एखादा प्राण्यांना मारून त्यांच्या प्रेतांसोबतचे photos गर्वाने मिरवणारा professional शिकारी त्यांनी, पण तरीही. त्यांना बेशुद्धच करायचं होतं, पण तू आली असशील अंगावर, मेलीस मग!
असो. आता कल्याण होईल तिथल्या गावांचं, जंगलाचं, जगाचं! त्या मेलेल्या 13 लोकांच्या आत्म्यांना शांती मिळेल आता. काय? तुझे बछडे? बघतील गं ते फॉरेस्टवाले. तू नको काळजी करू. मी? मी कुणी नाही गं. तुझ्यावरच्या बातम्या वाचून फक्त हळहळणारा, काही वेळाने विसरून जाणारा, मस्त रोजच्या दिनक्रमात रमून जाणारा एक सामान्य चेहरा आहे मी.
तुझ्याशी देणंघेणं होतं गं, पण काय करणार? रुटीन—

वरील प्रक्रिया आता सोशल मीडियावर वेगाने व्हायर होत आहेत .भारतीय जंगलात तसे वाघ हा प्राणी दुर्मिळच होत आहे त्यात राज्य शासनाच्या वन विभागाने घेतलेला हा निर्णय आपल्या वन्य जीव रक्षणाच्या प्रणालीला चुकीच्या बाजूने घेऊन गेलाय .

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *