धम्माचे आचरण नसल्यामुळे घर वापसी?.

धम्माचे आचरण नसल्यामुळे घर वापसी?

 लेखक सागर तायडे

भारतात राजकीय सत्ता परिवर्तन झाल्यामुळे प्रचंड उलथापालथ होत असतांना दिसत आहे.त्यामुळे अल्प संख्याक मागासवर्गीय समाजाची देशभरात मुस्कटदाबी होत असतांनाच अन्याय,अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यांची दखल मागासवर्गीय समाजाने गांभीर्याने घेतली पाहिजे होती.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की सत्ता ही हर समस्या ची गुरुकिल्ली आहे.म्हणूनच तुम्ही सत्ताधारी बनु शकत नसाल तर प्रभावी विरोधी पक्षाची शक्ती तुमच्यात असली पाहिजे.त्यासाठी तुम्ही जागृत असले पाहिजे. मग आता राज्यातील देशातील एकूण सत्य परिस्थिती पाहिली तर आपण खरच जागृत आहोत काय?. हिंदूधर्माचा त्याग करून आम्ही तथागताचा विज्ञानवादी धम्म स्वीकारला. धर्म सोडला आणि धम्म स्वीकारून धम्मचक्र परिवर्तन केले.त्या धम्मचक्र
प्रवर्तन दिनाला ६२ वर्ष पूर्ण होत असताना. त्यांनी दिलेले धम्म आज हि समाजात पूर्ण रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही.आणि खूप मागे हि राहलो असे म्हणता येत नाही.

बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती,नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होतात.

मातृसंस्थेचे प्रशिक्षक उपासक उपाशिका हताश पणे पाहतात.स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्मसमभाव च्या राजकीय मंत्राचा मना पासून आदर करण्याचा आव आणतात.त्यामुळे आम्ही ” बुद्ध आणि त्याचा धम्म ” हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण समाज व आंबेडकरी चळवळ दिशा हीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही.असे लिहले तर चूक ठरणार नाही.१४ ऑक्टोबर १९५७ पासुन धम्मचक्र प्रवर्तन दिन किधी साजरा करावा १४ ऑक्टोबर की अशोका विजया दशमी हा वाद मिटला नाही.जो तो आपण बुद्धिजीवी आहोत मी म्हणतो तेच बरोबर आहे असे समजुन त्यांच्या संस्था, संघटना १४ ऑक्टोबर लाच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी असंघटीत अशिक्षित वंचिंत शोषित अस्पुष्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या.आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित  वंचित शोषित समाजाची काय अवस्था असेल.या चिंतेने ते सतत तळमळत.यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्या साठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला.सातासमुद्रापार पर देशातून उच्च विद्याविभूषित होऊन, कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क,व प्रतिष्ठे साठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला.आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद ,संघटना,व राजकीय दबाव याचा समाजा करीता एक हत्यार म्हणून वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधी अंगीकार व समर्थन केले नाही.कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले.आजचे नेते एका आमदार, खासदारकी साठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करण्यास भाग पडतात.तीच परिस्थिती धम्मभूमी, दीक्षाभूमी व चैत्यभूमीच्या वापराची [व्यापराची ] झाली आहे.
त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे वंचित शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनला होता. उच्चवर्णीयानी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोळा भक्त (अंधश्रद) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला.मनुस्मुर्ती जाळली,महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली,नाशिक काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान.चातुर्वण्य समाज व्यवसस्थेवर घणाघाती घाव घातले ,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ ला येवले येथे धर्मातराची घोषण आणि प्रतिज्ञा केली. वंचित शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविणार.आणि आज खरेच वंचित शोषित समाजात जास्तीच बद्दल झाला. त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभाव चा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकरी समाज असलेल्या वस्त्यातील बाल्लेकिल्यात शेणखत काढून पोट भरणाऱ्यांची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाले.विविध पक्षाचे घाणीतील कार्यकर्ते म्हणून ओळखळ्या जातात.त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना,पक्षात फुट पडून वाटोळे करणे.

  माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे.माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते.यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती .ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती.त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही विहारात “बुद्ध आणि त्याचा धम्म ” वाचतो.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्ताचा एक थेंबही न पाडता, सामाजिक धार्मिक क्रांती केली. आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे.धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये.तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.या साठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं ?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे. याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला,आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता “सर्वधर्मसमभाव ” ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत.

     बुद्धाचा धम्म मानवतावादी,विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे.मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो. जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो.शिल,सदाचाराची शिकवण देतो.या धर्मात धम्मात ईश्वराला, काल्पनिकतेला,कर्मकांड,व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील  आणि विज्ञानवादी आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाज यात कमी दिसते.सर्व समाज राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभाव चा मागे जाताना दिसतात.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे ?.धम्मचक्र गतीमान करून परिवर्तन करणार कि घर वापसी?.धम्माचे आचरण नसल्यामुळे घर वापसी निश्चित असणार आहे.त्यांचे आत्मपरीक्षण करून आत्मचिंतन करण्याची तयारी सर्वानी दाखवली पाहिजे.जिथे चुकीचे घडते तिथेच संघटित आवाज निघाला पाहिजे.संघर्ष न करता चर्चा घडली पाहिजे.त्यातुनच योग्य मार्ग निघेल.धम्माचे आचरण झाले पाहिजे त्यावर गांभीर्याने विचार,चर्चा झाली नाही तर घर वापसी निश्चितच आहे.

आयु सागर रामभाऊ तायडे.मोब –९९२०४०३८५९
ए /५,इनायत नगर ,गावदेवी रोड,भांडूप (प ) मुंबई –४०००७८
(प्रस्तुत लेखक कामगार नेते असून ते असंघाटीत कामगार यांच्या न्याय हक्कासाठीं काम करतात.)
भांडुप मुंबई

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

पोलादी (लोह) पुरुषाला देखील वाकविणारे बाबासाहेब....!

शुक्र नोव्हेंबर 2 , 2018
Tweet it Pin it Email   पोलादी (लोह) पुरुषाला देखील वाकविणारे बाबासाहेब….!  ३१ ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हटले जाते. सरदार वल्लभभाई पटेलांनी तर जाहीरपणे स्टेटमेंट ही दिलं होतं की, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतली […]

YOU MAY LIKE ..