“देश की जनता भुकी है।यह आझादी झुटी है”

“देश की जनता भुकी है।यह आझादी झुटी है”
आज संपूर्ण भारतात ७२व स्वतंत्र दिन साजरा करत असताना,मला नेहमी एक प्रश्न पडतो की,आपलं भारत देश खरोखर स्वतंत्र झाला आहे का?हा मुख्य प्रश्न आहे.
आपला भारत देश हा समता,स्वतंत्र,बंधुता, न्याय,वर आधारीत आहोत का?ही आपल्या भारताची राज्यघटना वरील तत्वावर चालते का?आपले केंद्रीय सरकार ती राज्यघटना आमलात आणते का?असे असंख्य प्रश्न माझ्या मनात रेंगाळत असतात. समता बंधुता,स्वतंत्र,आणि न्याय ह्या संविधानाचे चार खांब असताना त्यांना वेळोवेळी न्याय मिळतो का हा ही प्रश्न माझ्या मनात नेहमी रेंगाळत असतो.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर मंतर वर संविधान प्रत जळताना हरामखोर,नीच औलादिनी,बाबासाहेबांचा निषेध नोंदवला,त्यांचा धिक्कार केला गेला,पण कोणत्याही एका पक्षाने त्याचा साधा निषेधही नोंदवला गेला नाहीं ह्याचा अर्थ नक्की काय समजायचा, वरील राजकीय पक्षाने त्या गोष्टीचे समर्थन केले असे समजायचे का?की त्या पक्षातील जे स्वतःला बाबासाहेबांच्या भक्तांनी सुध्दा एक ब्र सुद्धा काढला नाही,अश्या भक्तांना कसा आपण म्हणू शकतो की तो बाबासाहेबांचा अनुयायी आहे,त्याला फक्त मी भक्त म्हणूनच संबोधू शकतो,कारण असा फ़क्त बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग,जेव्हा स्वार्थ असेल तेव्हाच करतो.अश्या स्वार्थी भक्तांचा मी नेहमीच निषेध करत आलो आहे आणि करत राहीन.
समता:-आज आपल्या देशात वेळोवेळी,जातीयता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाणवते,आपण महाराष्ट्रात राहत असताना जरी ते जाणवत नसली तरी खेड्या पाड्यात नेहमीच ती जाणवते,हा वाद नेहमीच जाणवतो.उदा. शिरडीचे असो,किंवा भोतमांगे असू दे अश्या कुठे ना कुठे देशातील कानाकोपऱ्यात अश्या घटना घडत असतात.दुसरा प्रश्न असा आहे की,आपला देश हा पुरुषप्रधान देश म्हणजेच पुरुषच सर्व काही आहे अशी शुद्ध एक मानसिकता आहे.परंतु आपण जर परदेशात पाहिले तर आपणाला जाणवेल की तिकडे महिला आणि पुरुष असा भेदभाव केलाच जात नाही,आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या देशाला प्रगतीपथावर नेण्यास नेहमी अग्रेसर असतात.ह्याचा अर्थ असा नाही काढत मी की भारत ह्याबाबतीत मागे आहे पण ते फक्त मर्यादित .गाव खेड्यात तर महिला शिक्षणाबाबत खूपच मागास आहे.जो पर्यंत आपण घटनेचं अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत ही दरी वाढत जाणार आहे. आणि न सुटणारा प्रश्न आहे,जेव्हा ह्या देशाच्या घटनेची व्यवस्थित अंमलबजावणी होणार नाही तो पर्यंत ही समता कधीच प्रस्तापित होणार .
जेथे समता नाही तेथे बंधुता कशी न नांदू शकते.
बाबासाहेबानी घटना लिहिताना सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यासमोर ठेवले, जे मागास आहेत,जे बँकवर्ड आहे,ज्यांच्यावर,सवर्ण अन्याय करत आहे,जे अन्याय अत्याचाराला बळी पडत आहेत,आणि त्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय ही त्याच पद्धतीने केला.बाबासाहेबानी 26 नोव्हेंबर १९४९रोजी घटना लिहिताना,दोन वर्षे,अकरा महिने,अठरा दिवस,एव्हढा कालावधी आपला अनुभव पणाला लावून सर्वसामान्य नागरिकाला घटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला,पण ह्याची जाण ना कोणत्या तथाकथित स्वतःला दलित समजणाऱ्या नेत्यांना आहे ना त्यांच्या चेल्यानं आहे,ह्याची जाणीव फक्त सर्वसामान्य जनता आहेत,की ते बाबासाहेबाना आपला मार्गदाता समजतात.परंतु काही हरामखोर नीच प्रवृत्तीचे लोक तीच घटना जंतरमंतर वर जाळून समाजामध्ये घटनेबद्दल गैरसमज पसरवून लोकांमध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
२६जानेवारी १९५० ला जेव्हा ही राज्यघटना म्हणजेच आपल्या देशाची आचारसंहिता अंमलात आणली गेली,त्या दिवशी दिवशी बाबासाहेबानी समस्त राजकीय तथाकथित नेत्यांना सांगितले होते की,जेव्हा शासनामध्ये बसणारे लोक राज्यघटना प्रामाणिक पणे जर अंमलात आली तर राज्यघटना प्रामाणिक आहेत,पण राज्यकर्ते नालायक असतील तर घटना शुद्ध नालायक आहे,असे बाबांचे वक्त्यव्य हे खरे वाटायला लागले आहे,कारण, आज कितीतरी केसेस अश्या आहेत मग त्या बलात्काराच्या असू दे,भ्रष्टाचाराच्या असुदे, त्याला कितीतरी वेळ लागून त्याला त्या अश्याच पेंडीग आहेत,आणि ज्याच्याकडे पैसे आहेत,तो पैश्याच्या आधारे असा गुन्हेगार सुटत हणी ज्याच्याकडे पैसे नाहीत तो गरीब अत्याचाराला बळी पडत आहे,मग तुम्हीच ठरवा,आपण कसे स्वतंत्र आहोत,.
आज देशात गरिबी,बेरोजगारी,बलात्कार आरक्षण मुद्दे,असे कितीतरी प्रलंबित प्रश्न आहेत,पण त्याला योग्य न्याय कोण देणार हाही महत्वाचा प्रश्न आहे ,कारण आजचे नेते फक्त लोकांना भावनिक मुद्दे उपस्थित करून वरील मुद्दे रशिवर सुकत ठेवले आहेत.
आज भारतातील सर्व नागरिकांना फक्त आणि फक्त राज्यघटना वाचवू शकते पण त्याची अंमलबजावणी करणारे योग्य लोक पाहिजे,
आणि जो राज्यघटनेची अंमलबजावणी करणारे लोक जेव्हा प्रामाणिक देशभक्त असतील आणि राज्यघटनेची योग्य अंमलबजावणी करतील तर नक्कीच,ह्या देशातील,गरिबी,बेरोजगारी असे कितीतरी केसेस ज्या पेंडीग आहेत,त्या सोडवायला वेळ लागणार नाहीत आणि देशातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आणि तेव्हाच हा “भारत” देश स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही.
🇮🇳जय भारत🇮🇳
🇮🇳मी भारतीय🇮🇳
अनिल जाधव

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *