त्यागात तुझिया…!

त्यागात तुझिया…!

छाटलेले पंख,
बंधिस्त आकांक्षा,
धर्मरक्षितांच्या पाशवी,
निर्मिलेल्या कक्षा…!

मायेचे मायपण गे,
पोरख्या लेकराना,
तोडुन श्रृंखला त्या
सामर्थ्य दिले पाखरांना…!

नाही अडली,
कुणासवे इथे,
विद्रोह करण्या
जहाल्या मुक्तीपथे…!

शेण शिंतोडे अन
शाप शिव्या दगड माती
उघडे बोडके धर्ममार्तंड
संपवल्या धर्म जातीपाती..!

अखंड वसा ज्ञानाचा,
घरोघरी पेटल्या ज्ञानज्योती,
कसे विसरु उपकार माते,
त्यागात तुझ्यात इथली माती..!

बंद कवाडे फोडण्या
सरसावले लाखो हात
धर्मरुढींची बजपुरीची
झालीय दैना हातोहात..!

एक शल्य तिचकेच मोठे,
न्याय अजुनही झालाच नाही,
त्याग तुझा,बलिदान तुझे,
बालकांना तुझीया कळलेच नाहि..!

कसे फेडावे पांग तुझे
ज्ञानियांची माय तु
एक ज्योत लखलखणारी
कोटी कोटी लेकिंची
स्वाभिमानि आय तु…!

माते विनम्र वंदन तुला
लाख करोडो लेकीसुनांचे
अन अभिनानानं जगणार्‍या
अगनित तुझ्या लेकांचे…!
——प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *