ठाकरे चित्रपट आणि अड प्रकाश आंबेडकर यांची समीक्षा

समीक्ष
बाळ ठाकरे वर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी सिनेमा काढून ज्याने कधी साधी निवडणुक लढ़ली नाही, ज्याने जातीपातीचे राजकारण आणी इतर धर्मीयांचे द्वेष केले अशा बाळ ठाकरेनां देशाचा खुप मोठा नेता सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न आणी आता येणाऱ्या निवडणूकीच्या काळात निदान महाराष्ट्रात शिवसेनेची हवा निर्माण करण्याचा प्रयोग केला आहे, ऐवढ़च.

परंतु —
” एकदा इतिहासात डोकावलं तर शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतर सुरु झालेली गुंडगिरी याची परिसीमा बाळ ठाकरेनी त्यावेळी गाठली होती, मुंबई मध्ये दहशतीच वातावरण निर्माण करून एकप्रकारे हुकुमशाहीला चालना बाळ ठाकरे आणि शिवसेनेने केली होती, त्याच काळात मागासवर्गीयावरील अत्याचाराच्या विरुद्ध बंड करण्यासाठी दलित पैंथर ची स्थापना झाली, शिवसेनेने मद्राश्यांच्या विरोधात पेटवून दिल्यावर मुंबईत मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात आली, त्यानंतर ठाकरेनी कानडी लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले. या लढ्यात मराठी विरुद्ध कानडी अशी बत्ती पेटवून सामान्यांच्या जिवाची होळी केली. एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा मृत्यू व २७४ लोकं जखमी झालीत. त्यानंतर जून १९७० माकपा चे आमदार आणि युनियन लिडर कृष्णा देसाई ची हत्त्या घडवून आणली. इथवर ते थांबले नाही तर १९७४ ला दलित पैंथर नेता भागवत जाधव यांचा खून केला आणि आंबेडकरी समाजात प्रचंड दहशत निर्माण केली त्यानंतरही विदर्भात दलितावर हल्ले सुरूच ठेवले, कधी दक्षिण भारतीय, कधी शीख, कधी मुस्लिम तर आंबेडकरी जनतेवर या नराधमांनी हल्ले सुरूच ठेवले हा सगळ्या माजामागे कांग्रेस होती आणि शरद पवारांचा वरदहस्त होता म्हणून शिवसेनेने गुंडगिरी निर्माण केली, त्यानंतर “Riddles in Hinduism” हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये, यात हिंदू देव देवतांचा अपमान आहे हि भूमिका तेव्हा बाळ ठाकरेनी घेतली होती. त्या वेळी जवळपास ४ महिने वातावरण आंबेडकरी जनता विरुद्ध शिवसेना अस राहील होता, जानेवारी १९८८ ला निघालेल्या शिवसेनेच्या मोर्चाने लोकांना चिथावणी देऊन जमवल ” ज्याच खर रक्त हिंदूच असेल त्यांनी या मोर्चात याव”, या मोर्चात बाबासाहेबावर अभद्र शब्दात बोलल्या गेलं, त्यात आनंद दिघे ह्या शिवसेनेच्या नेत्यापेक्षा या नराधमाने अकलेचे तारे तोडून बाबासाहेबांच्या आई माता भीमाबाई बद्दल संशयी भाषा वापरून सकपाळ ते आंबेडकर कसे झाले अशा प्रकारचे वक्त्यव्ये करून आंबेडकरी समाजाला चिथावले. याचा राग म्हणून ५ फेब्रुवारी १९८८ ला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृवात मंत्रालयावर मोर्चा काढला. आंबेडकरी तरुण आणि शिवसैनिकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यातच हुतात्मा स्मारकाजवळ आपल्या आंबेडकरी तरुणाकडून नासधूस झाली, दुसऱ्या दिवशी आताचे नकली ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बाळ ठाकरेच्या आदेशाने चबुतरा गोमुत्राने धार्मिक विधी करून शुद्ध करून मनुवादी विचारसरणीचा परिचय करून दिला . पुढे मंडल आयोगाचा लढा सुरु झाला. हा लढ़ा प्रकाश आंबेडकरानी व्ही. पी. सिंगच्या मदतीने लढून यशस्वी केला, त्याच काळात छगन भुजबळ ला स्वताची जाणीव होऊन त्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

इथवरच बाळ ठाकरे आणि त्याची सेना थांबलीे नाही तर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यास विरोध केला, मराठा आणि दलित वाद निर्माण करून १४ वर्षे दलितावर अत्याचार सुरु ठेवला, या काळात बाबासाहेबावर चिखलफेक करण्याचे काम बाळ ठाकरे ने केले, ‘बाबासाहेब निजामाचे हस्तक’,’ज्याच्या घरात नाही पीठ ते मागतात विद्यापीठ’, महारांनी आमच्या नोकऱ्या पळवल्या अशाप्रकारची विधाने केली तितकीच चिथावणीला साथ राज ठाकरे ने दिली होती. मराठवाड्यात आंबेडकरी समाजावर हल्ले करण्याचे आदेश राज ठाकरे देत होता, हे सध्या मनसे मध्ये काम करत असलेल्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे, अखेर नामांतर न होता नामविस्तार झाला तत्कालीन शरद पवार सरकारचे असलेले मंत्री रामदास आठवले यांनी समझोता करून या वादावर पडता टाकण्यास मदद केली. परंतु नांदेड विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असे नामकरण केले पण मराठवाडा विद्यापीठासमोर बाबासाहेबांचे नाव लावून फक्त नामविस्तार केला. या लढ्यात पोचीराम कांबळे, गौतम वाघमारे यांना हुतात्म आले परत यांचीच टिंगल म्हणून बाळ ठाकरे ने गौतम वाघमारे ना बेवडा संबोधून आणखी ठिणगी टाकली. अनेक लोकांचे प्राण गेले, घरे गेली, या सर्वानां कारणीभूत बाळ ठाकरे आणि कॉंग्रेस जबाबदार होती. अलीकडेच बाळ ठाकरे ने मरण्यापूर्वी एका tv मुलाखतीत एक मोठा खुलासा केला कदाचित सर्व आंबेडकरी लोकांना माहित नसेल पण मराठवाडा विद्यापीठाची settlement करण्यासाठी रा. सु. गवई ना जेवण्यासाठी बोलावलं आणि विद्यापीठाचे नामांतर न करता हा नामविस्तार करू त्यावर जेवताना रा. सु. गवई लगेच तयार झाले पुढे काय झाल आपल्याला माहिती आहेच आणि मी कधी नामांतराला विरोध नाहीच केला हि भूमिका बाळ ठाकरे ने मांडली. या वरून काय सिद्ध होते, आंबेडकरी नेत्याची हि लाचारी कि स्वाभिमानी वृत्ती यावर समाजच अधिक विचार करू शकतो या निमित्ताने सांगावसेे वाटते.”

वर थोडक्यात उल्लेखलेल्या बाळ ठाकरे आणि त्यांच्या सेनेने केलेल्या दुष्कृत्याची आंबेडकरी समाजातील लहान मुल पण कधीच समर्थन करणार नाही.

अॅड. प्रकाश आंबेडकर

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *