जगभर तूझ्या आदर्शाचा उमटला ग ठसा

जगभर तूझ्या आदर्शाचा उमटला ग ठसा
सांग रमाई संसाराचा गाडा हाकीलास कसा ।। धृ ।।
लेक तू भिकू वणंद करांची
सून लाडकी सुभेदाराची
र्धम पत्नी तू दिलदाराची
नवभारताच्चा घटनाकाराची
परणीली नवरी नवू वर्णाची
बाळ वयात संसाराचा शीरी गणेशा असा ।। १।।
तारूण्याचे ते नवपण येता
धनी अभ्यासात गढून जाता
हळूच बोळी कधी जाता येता
प्रितीच्या लज्जेने तू चूर होता
कूस उजवून झालीस माता
स्वर्ग सुखाचा आनंद जसा,झाला तूला कसा ।। २ ।।
सोडूनी मायेच ते घरदार
सखा तूझा परदेशी दूर
दाटून येई आई तुझा ऊर
नयनी वाहे अश्रूचा पूर
विदेशी राजा लई माझा दूर
याद सख्याची येता आई, रढशी ढसा ढसा ।। ३ ।।
धन्याच्या सुखाला तू न्याहळीत
होतीस उपास नवस पाळीत
संसार भार कुडी जाळीत
वरळी गावात रोजी वाळीत
रहात होतीस डबक चाळीत
सरपण नसता संसार जाळया, जाळशी लाकडी भूसा ४
जीवाचा जीवलग मैतर
महारात पहीला होवून बॅरीस्टर
ओलांडूनी आला सातासमुंदर
फूलविण्या दलितांचा संसार सुंदर
जीवनात न पडो पुन्हा ते अंतर
न्यारेच घठले पुढे आई नंतर
महाड नाशिकला घेई भरारी, होऊन गरूड जसा ।५।
धनी तुझा ग जाता रणी
लागलीस तू मन झूरणी
ध्यास तुझ्या ग एकच मनी
करी दयाला वीनवनी
त्यागशी त्याच्यात तु अन्न पाणी
चिंतेने काया लावी धरणी
आधीच आई काया तुझी, जणू तोळा मासा ।६।
दाग दागिन्याची तुला ग हौस
पण धन्याशी होतं कुठ पैसे
धन्याच्या चरणाशी सुखाची आस
हाच तुझा एक ठाम विश्वास
दिला ना कधी तू पतीला ञास
तुझ्या धन्याचा जनसेवे पायी, सदा फाटक खिसा ।७।
राज गृह तो होताच उभा
तुझ्या संसाराला घ्यावया शोभा
विसावता थोड्या धन्याच्या सभा
तुझा आनंद भिडे जणू नभा
मृत्युने धरता तुज वरती दबा
ठेवून गेलीस धन्याला उभा
चित्तरंजनापरी रमाईचा इतिहास कुणी ही पूसा ।८।
कवी दि.चितरंजन पवार
(कवी चिंतरंजन हे जुन्या काळातील प्रसिद्ध आंबेडकरी चळवळीतील कवी आहेत त्यांची गीते महाराष्ट्रातिल ख्यातनाम गायकांनी गायली आहेत.)

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *