चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व

चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व

सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी वैगरे मोठी राज्ये व इतर मांडलिक राज्यांचा समावेश ही आहे त्याशिवाय कामरूप, बंगाल , आसाम, ओरिसा पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व भाग अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता म्हणून अशोकाला चक्रवर्ती सम्राट म्हटले जाते .
जगातील लोकांना भारतीय इतिहासाची खरी ओळख करून देणारा राजा म्हणून सम्राट अशोकाला अग्रगण्य स्थान दिले जाते आणि दिलेच पाहिजे . त्याने आपल्या राज्यात बौद्ध धम्माला राजधर्माची मान्यता दिली व मैत्रीचा संदेश घेऊन जगभरात धम्मदूत पाठवले . तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात अशोकाच्या आदेशाचे माहितीचे शिलालेख अभिलेख लघुलेख गुहालेख स्तंभ लेख कोरून ठेवले आहेत आणि त्यामुळेच भारताच्या इतिहासाची खरी ओळख आपणास मिळते हे श्रेय अशोकालाच द्यावे लागते अन्यथा भारताचा इतिहास हा अंधारात च पडला असता त्याच्या कर्तृत्वाने भारतीय इतिहास हा एकदम प्रकाशमान झालेला आहे आणि हे कोणी नाकारू शकत नाही .
सम्राट अशोक हा राजा होण्याआधी तो तक्षशिला व उज्जयिनी च राज प्रतिनिधी म्हणून कारभार पाहत होता बिंदूसार याच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी अशोकाचा राज्याभिषेक झालेला आहे. अशोक हा ही महत्वकांक्षी राजा होता आणि अशोक नेहमी प्रजाहितदक्ष म्हणून जनतेच्या मनात कायम राहिला होता .
अशोकाला कलिंग राज्य आपल्या राज्यात असावे karann अशोकाच्या पूर्वजांनी अनेक प्रयत्न करून इ कलिंग आजवर जिंकता आले नव्हते आणि ही सल अशोकाच्या ही मनात कायम राहिली होती त्याला कलिंग हवे होते त्यावेळी कलिंग च राजा ब्रह्मदत्त आता भारताच्या ओरिसा प्रांतात दक्षिणेस कलिंग राज्य होते या राजाची बौद्ध धम्मावर खूप आस्था होती त्याने बौद्ध धम्मास राजश्रय दिला होता त्याची राजधानी दंत्तपूर आहे या शहराला नाव पडले ते कलिंग च्या लोकांनी बुद्धाच्या महापरिनिर्वाण झाल्यावर बुद्धाचा एक दात मिळवून त्यावर स्तूप बांधला होता म्हणून त्या ठिकाणाला हे नाव पडले होते व सारे लोक बुद्धाला मानणारे असल्याने आजवर त्यांच्या एकीमुळे कोणत्याच राजाला कलिंग जिंकता आले नाही अशोकाने आपल्या पूर्वजांनी अपुरे ठेवलेले भारत दिग्विजयचे कार्य पूर्ण करावे म्हणून इसवी सण पूर्व 261 मध्ये कलिंग वर स्वारी केली . मित्रानो अशोकाच्या आयुष्यातील रणमैदानातील पहिली लढाई आणि शेवटची लढाई ठरली
कलिंग राज्याच्या सैन्याचा पाडाव होत असलेले पाहून सामान्य जनतेने ही हातात शस्त्र घेऊन लढाईला उतरले व सामान्य जनतेला रनमैदानात पाहून अशोकाचे मन युद्ध करण्यापासून दूर झाले या युद्धात अनेक जीवांचा बळी गेला होता अशोकाला ते आपल्याच लोकांचा गेलेला बळी पाहून खूप दुःख झाले त्याने विजय मिळवल्यावर तलवार म्यान केली परंतु या युद्धाचे परिणाम असे झालो की लाखो लोक मारले गेलं होते त्या परिसरात रोगराई पसरली साम्राज्य विस्ताराच्या आकांक्षेमुळे अनेक जीव मारले गेले हे पाहून सम्राट व्यथित झाला आहे आधीच। त्याच्या घरी देखील बुद्ध धम्माचा प्रभाव होता त्यात त्याचा चुलतभाऊ उपगुप्त हा भिक्षु बनला होता उपगुप्ताने सम्राटाला बुद्धाच्या शिकवणीची सार समजावून सांगितले अशोक याने तेव्हा विचार केला की माणसे मारण्यापेक्षा माणसे जगवली पाहिजेत आणि अशोकाने पुढे आपला राज्यकारभार नव्या पद्धतीने सुरू केला जगाला नवे मॅनेजमेन्ट दाखवले अशोकाने बुद्धाच्या जन्म स्थळाला भेट दिली सारनाथ इथे भेट दिली व नंतर अशोकाने धम्म प्रसार करण्याचा निश्चय केला एक सुराज्य निर्माण केले गेले
अशोक हा केवळ धम्म प्रसारक होता इतकेच आजवर लोकांसमोर अशोक घेऊन आले इतिहासकार सम्राट अशोक याने आपल्या राज्यात रयतेच्या हितासाठी केलेलं कार्य आत्याधुनिक सुविधा निर्माण करून देणारा राजा म्हणून इतिहासात नोंद घ्यावी असा एकमेव सम्राट म्हणून अशोक याला गणले जाते
जगातील पहिला सम्राट आहे ज्याच्या कालावधी मध्ये निसर्गाला ही दुष्काळ ग्रस्त स्थिती निर्माण करता आली नाही एवढे सामर्थ्य असणारा राजा म्हणून आम्हाला अशोक कधीच सांगितलं नाही आज दुष्काळ का पडतो यासाठी सम्राट अशोकाचे मॅनेजमेन्ट पाहावे लागेल आम्ही म्हणतो पाणी नाही सुखा दुष्काळ पडतो पाऊस जास्त पडला ओला दुष्काळ पडतो अशोकाच्या राज्यात निसर्गाचे ही मॅनेजमेन्ट करणारा जागतिक पहिला सम्राट आहे . याची आम्हाला माहितीच नाही अशोकाने पाऊस जास्त पडला तर कोणत्या ही भागातील पीक वाहून जाऊ नये म्हणून शेतीचे मॅनेजमेन्ट केले आहे शेतीची पिके अश्या असणाऱ्या भागात पावसाचे पाणी साठणार नाही किंवा पिके वाहून जाणार नाहीत यासाठी विशिष्ट पाण्याची नहर तयार केले होते शहरणाची रचना कशी असावी हे त्यांचा आराखडा अशोकाने तयार करून घडवलेली शहरे आज आपण पाहू शकतो आज जी शहरे सुशोभित पाहायला मिळतात त्यांची रचनाकार का सम्राट अशोक आहे आज भारतीय शहर रचनेला सौंदर्य दृष्टी नाही अनेक चिनी प्रवाशांनी अशोकाच्या साम्राज्याचे वर्णन केले आहे त्यात शहरांचे सुशोभीकरण व त्यांची रचनाकृती मांडली आहे.

अशोकाने आपल्या जनतेला अद्यवत सर्व सोयी सुविधा निर्माण करून दिल्या आहेत . घर तिथे पाण्याची सुविधा निर्माण करून देणारा राजा म्हणून अशोकाला प्रथम स्थान दिले पाहिजे. आज आम्ही नळ योजना राबवतो अशोकाच्या राज्यात घराघरात पाण्याचे सोय उपलबध केली होती पाण्याचे मॅनेजमेन्ट करणारा राजा म्हणून ही सम्राट अशोकाला स्थान आहे
अशोकाने शेतीला उद्योग जगतात अनन्य महत्वाचे स्थान निर्माण करून दिले . म्हणून भारत हा शेतीप्रधान देश आहे असे आज आम्ही म्हणतो अशोकाने शेतकऱ्यांच्या बाजारपेठा निर्माण केल्या शेतकऱ्यांना हमीभाव दिला शेतकरी हाच शेतमालाचा व्यापारी होता जगातील पहिला सम्राट आहे ज्याने शेतकऱ्यांना व्यावसायिक बनवले आणि याचे पुरावे पाहिजे असतील तर भारतात लेणी कोरण्यासाठी व्यापारी लोकांसोबत शेतकरी लोकांची ही नावे आहेत
शेतकऱ्याला अशोकाने जागतिक बाजारपेठेत नेऊन ठेवले आज आमचे शेतकरी नेते व जनता ही शेतकरी आत्महत्या करतो म्हणून रडत बसली आहे त्यांनी सम्राट अशोक समजून घेणे आवश्यक आहे राज्यकर्त्यांनी ही सम्राट अशोकाला समजून घेणे आवश्यक आहे
आज आम्ही भारतीय राजमुद्रेत चारी बाजूने असणारे सिंह पाहतो सम्राट अशोकाचा हा संदेश आहे की देशाच्या चाहुबाजूच्या सीमा सदैव जागृत असाव्यात आम्ही मात्र समुद्री भागाकडे दुर्लक्ष केले आणि आमचा यात च नुकसान झाले आहे
अशोकाच्या राज्याच्या सत्यमेव जयते म्हणजे सत्याशिवाय राज्यात खोटेपणा कोणी केलेला चालत नव्हता आणि अशोकाच्या राज्याचा हा नियम इतका कडक होता की राज्यात कधी इ चोरी झाली नाही खून झाले नाहीत बलात्कार झाले नाही याला शासन म्हणतात अशोकाने आदर्श घालून दिला आहे तो हा आहे
लोकांनी आजवर अशोकाला ही मर्यादित करण्याचे काम केले आहे आज अशोकाला जागतिक लेव्हल ला प्रेझेंट केले पाहिजे
अशोकाने बौद्ध धम्माला राजश्रय दिला म्हणून इतर धर्माचा अनादर केला नाही कोणावर धम्माची जबरदस्ती ही केली नाही जनतेने स्वखुशीने धम्म स्वीकारला अनेक भागातील राजांनी साम्राटाचे मैत्रीचे संदेश स्वीकारले व त्याच्या एका छत्राखाली काम करण्यास मान्यता दिली
लोकांचा गैरसमज आहे की अशोकाने धम्म स्वीकारली आणि तलवार म्यान केली तर तसे नाही अशोकाने राज्याची सूत्र कोणाच्या च हाती दिलेली नाहीत अशोक हा नेहमी तलवार सोबत घेऊन दिसतो करण राजशाही मध्ये ती राजाची महत्वाची निशाणी असते
अशोक हा आधुनिक लेखन कौशल्याचा प्रणेता आहे आज आपण लिपी वापरतो तिचा निर्माता हा अशोक आहे अशोकाने तिचा वापर करून आपले लेख कोरले व भारताच्या इतिहासाला प्रकाशात आणले
सम्राट अशोकाने जनतेच्या हितासाठी केलेली कामे थोडक्यात पाहू या
जनता रस्त्याने प्रवास करते त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड सामान्य जनतेकडून च घेतली आहे. कारण जनतेला त्याचे महत्व पटावे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलीच पण वाटेत कोणत्या हि वाटसरूला पाण्यासाठी वणवण करावे लागू नये म्हणून नियोजित ठिकाणी पाण्याचे तळे निर्माण केले आहे प्रवाशी निवास तयार केलेत अशोकाने व्यापारी तसेच सामान्य जनता ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याला कोणी चार लुटारू निर्माण होऊ च नये सामान्य माणसाला रोजगाराची संधी निर्माण करून दिली अशोकाच्या राज्यात बेरोजगारी नावाची समस्याच नव्हती म्हणून सोन्याची असेल व कोणत्या हि पद्धतीची चोरी दरोडे अशोकाच्या राज्यात झालेले इतिहासात पाहायला मिळत नाही
याला मॅनेजमेंट म्हणतात एवढे बलाढ्य साम्राज्य असून एका हि ठिकाणी चोरी नाही दरोडा नाही इतकेच काय अशोकाच्या चारी बाजुंच्या सीमेवर सैन्य तैनात आहेत आज आपण मिलिटरी व पोलीस यंत्रणा पाहतो तर याचा प्रणेता अशोक आहे
अशोकाचे दोन दल आहेत एक सीमेवर पहारा करणारे व एक दल अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी अशोकाचे सैन्य व्यवस्थपन हि पाहण्या जोगे आहे ६ लाखाचे पायदळ आहे हत्ती दल अश्वसेना अश्या प्रकारे सर्वच प्रकारची युद्ध यंत्रणा आहेच पण त्याच बरोबर अशोक जगातील पहिला राजा आहे ज्याने समुद्रावर हुकूमत गाजवली आहे परदेशात भारतीय वस्तूंचा व्यापार करणारा अशोक भारताचा पहिला उद्योजक आहे नुसते राजा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहणे देखील चुकीचे ठरते कि काय असे वाटू लागते कारण अशोक भारतात असणाऱ्या सर्ववस्तूचे जगाच्या बाजारपेठत आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवतो आणि हे एक यशस्वी उद्योजक च करू शकतो ते अशोकाने या जगाला करून दाखवले आहे .
अशोकाने सामान्य जनतेसाठी सर्व सुखसोयी निर्माण करून दिल्या आहेत
जगातील एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून सम्राट अशोक यांच्याकडे पाहावे लागते
आज भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली कारण मुख्य पायाच ढासळला म्हणून
शेतीच्या व्यवसायावर जगात आर्थिक महासत्ता होता येते हे अशोकाने जगाला दाखवून दिले आहे.
अशोकाने आपल्या राज्यात प्राण्यांची शिकार बंद केली त्यावेळी राजे महाराजे आपल्या छंद जोपासण्यासाठी वन्य जीवांची शिकार करायचे अशोकाने त्यावर बंदी घातली त्याचा फायदा असा झाला कि वन्य प्राणी वाढले जंगले वाढली त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ लागला जेव्हा समतोल असतो तेव्हा निसर्ग हि कधी उत्पाद माजवत नाही तो शांत च असतो अशोकाच्या राज्यात झाडांची लागवड करणे जनतेला ससक्ती चे होते शिवाय शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून राज व्यवस्थे कडूनच च शेतमालाला हमीभाव दिला जायचा त्यामुळे शेतकरी अधिकाधिक शेती पिकवू लागला होता आणि बघता बघता शेतकरी सधन झाला हि अशोकाची रणनीती आज शासन स्वीकारेल तर भारताचा शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही या देशातील जनतेला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू ह्या बहुतांश शेती विषयकच आहेत शेतकऱ्याला अधिकाधिक धान्य पिकवून सरकार ने शेतकर्या कडून खरेदी केले व तेच धान्य परत जनतेमध्ये रास्त दरामध्ये दिल्यास शेतकरी सधन होऊ शकतात हे सम्राट अशोकाने इसवी सनापूर्वी करून दाखवले आहे आज त्याचे इम्प्लिमेंट होणे आवश्यक आहे सरकार कसे असावे यासाठी सम्राट अशोक अवश्य समजून घेणे आवश्यक आहे

शेतकरी व व्यापारी यांना कर प्रणाली मध्ये काही कर म्हणजे टॅक्स लावले होते ते सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच होते की आणि कोणाला ते देण्यास कधी कमी पडत नव्हती कारण त्यांच्या शेतमालाला डायरेक्ट अशोकाचा शासन यंत्रणेतूनच हमीभाव मिळत होता त्यामुळे कराच्या रूपात राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात येत असे शिवाय अशोक केवळ याच एका उत्पन्नावर राज्य चालवत नसे तर शेतकर्या कडून घेतलेला शेतीचा माल दुसऱ्या राज्यात व बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जाई त्यामुळे शासनाच्या तिजोरीत उत्पन्न वाढलेलं असते
अशोकाने शेतकऱ्यांकडून मिळालेला महसूल असेल किंवा व्यापाऱ्यांकडून मिळालेला महसूल हा लगेच वापरात आणला नाही त्याची साठवण केली आहे अर्थात आज आपण शेयर मार्केट वापरतो अशोकाने ते त्याकाळी वापरले आहे व्यापारासाठी आलेल्या वस्तूंचे जास्त किंमतीत विक्री करणे व कमी किमतीत वस्तू खरेदी करणे हे अशोकाचे वापरलेले दोन हजार वर्षापूर्वीचे तंत्र आहे आज आम्ही शेयर बाजारात वापरतो
यापेक्षा नुकसान भरपाई शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यापाराला नुकसान झाले असेल तर शासन व्यवस्थेतून त्याला नुकसान भरपाई दिली जायची आज आम्ही त्यालाच विमा म्हणजे अशोकाने दोन हजार वर्षांपूर्वी ह्या साऱ्या सोयी आपल्या जनतेसाठी अमलात आणलाय आहेत लोकांना त्यांच्या जीवनाची हमी देणारा जगातला पहिला सम्राट अशोक आहे. आज आम्ही जीवनविमा काढतो पण पण तो हि वेळेवर मिळत नाही अशोकाच्या राज्यात जनतेच्या जीवनाची हि काळजी घेतलाय जात होती सम्राट अशोकाचे राज्य परिपूर्ण यासाठीच आहे कारण त्याने निर्माण केलेलं प्रशासन जे आजच्या घडीला आपल्या भारतात नाही
आजच्या युगात सम्राट अशोकाच्या राज्याची पुनरावृत्ती व्हावी म्हणूनच बाबासाहेब यांनी घटनेत दिलेले अधिकार आज आम्हाला समजणे महत्वाचे आहे
सम्राट अशोक आपल्या जनतेला त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कधी हि तत्पर असायचा त्याच्या राजमहालाबाहेर असणाऱ्या घंटेचा नाद होताच अशोक बाहेर येत असे आपल्या जनतेची तक्रार ऐकत असे व काही क्षणात त्यावर निर्णय घेऊन त्या व्यक्तीची तक्रार निवारण करत असे आणि महत्वाचे अशोकाकडे कधी अशी तक्रार आल्याची नोंदणी च नाही कि पाणी नाही रस्ते नाहीत दिवाबत्ती ची सोया नाही अश्या मूलभूत गोष्टी अशोकाने वेळीच पूर्ण केलेल्या असत त्यामुळे जनतेला कधी त्यासाठी राजाकडे तक्रार करावीच लागत नसे अजून एक महत्वाचे गोष्ट आज आपण कंप्लेंट बॉक्स ची यंत्रणा पाहतो म्हणजे सरकार मध्ये तक्रार विभाग असतो अशोकाच्या राज्यात तो थेट अशोकाच्या नेतृत्वाखाली होती अखिल भारताच्या राज्याचे तक्रार निवारण अशोक स्वतः करीत आहे विचार करा काय नियोजन असेल त्याचे यालाच मॅनेजमेंट म्हणतात
सम्राट अशोकाला आम्ही बरेच संकुचित करून ठेवले आहे खऱ्या अर्थाने अशोकाचा राज्यकारभार जगासमोर आला पाहिजे पण बऱ्याच लोकांनी त्यावर प्रकाश टाकला नाहीअसे खेदाने म्हणावे लागते आहे
अशोकाने शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी केली आहे तक्षशिला विद्यापीठाला विश्वविद्या पीठचा दर्जा प्राप्त करून दिला तो याच काळात असे अनेक छोटी मोठी विद्यालये निर्माण केली गेली होती पण पुढे आलेल्या लोकांनी त्या विद्यापीठांची पुनरावृत्ती केली नाही संन्याश आश्रम सारखे विद्यापीठे चालू केली व शिक्षणाचा पाया या लोकांनी ढासळून टाकला
सम्राट अशोकाचे धम्म बाबत चे कार्य पाहू या
सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी जगात आपले धम्म दूत पाठवले सोबत प्रत्येक राजाला आपला मैत्रीचा संदेश पाठवला व ज्या ज्या राजांनी अशोकाचा संदेश वाचला ते ते लोक बौद्ध धम्माकडे वळले जगात बुद्ध धम्म पहिला विश्वधर्म म्हणून गणला गेला तो सम्राट अशोकाने अशोकाने बुद्धीच्या असती एकत्र करून त्यावर ८४ हजार स्तूप बांधले जगातला असा सम्राट आहे ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये ८४ हजार स्तूपांची निर्मिती तयी हि अवघ्या ४० वर्षाच्या कालखंडात बांधून घेतले काही स्तूपांची डागडुजी हि केली आहे
याचा एक महत्वाचा भाग म्हणजे अशोकाने बांधकाम करवून घेतलेलं स्तूप हजारो वर्षांनंतर हि बऱ्या पैकी आज उभे आहेत हे त्याच्या बांधकाम कौशल्यांचे प्रतीक आहे परदेशी शासकांनी जर का नासधूस केली नसती तर आज जगाला भारताचा तो ऐतिहासिक ठेवा पाहता आला असता तरी देखील आज आपण पाहतोच आहे अशोकाकडून अनेक राजांनी प्रेरणा घेऊन नंतर लेण्यांची निर्मिती होऊ लागली आहे . महाराष्ट्र तर अशोकाची प्रांतिक राजधानी होती व सातवाहन राजे अशोकाचे मांडलिक राजे होते त्यामुळे महाराष्ट्र बौद्धमय होता आणि त्याचाच प्रभाव हा कायम प्रत्येक राजवटीवर आपणास पाहायला मिळतो
प्रत्येक राजाने नेहमीच बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी काम केला आहे अगदी वैदिक राजांच्या काळात देखील लेण्यांचे काम थांबले नाही कारण जनता बौद्ध धम्मीय होती आणि त्यांनी आपल्या दानातूनलेणी उभारली हा अशोकाचा सर्वात मोठा विजय आहे भले अशोकाच्या काळात महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती नसली तरी पुढे निर्माण झालेल्या लेण्या ह्या अशोकाच्या बौद्ध धम्माच्या प्रसारामुळेच तयार झाल्या आहेत
अशोकाने जगाला सर्वात अमूल्य ठेवा देऊन गेला आहे

जगाला बुद्ध देऊन अशोकाने अलौकिक क्रांती केली आहे अश्या या सम्राटाला विनम्र  अभिवादन.

-रविंद्र सावंत

अभ्यासक

2 thoughts on “चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व

  1. Very nice information… Sir more information about Samrat Ashoka can u me suggest some books r available in market……from NANDKUMAR Bhambedkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *