खरे काय….?

माझे अज्ञान दूर होईल का ?

 – सागर तायडे

जगात ज्यांनी मानव जाती साठी ऐतिहासिक कार्य केले.त्यांना एक तर महापुरुष महामानव,संत,महंत,महाराज,राजे महाराजे,सम्राट असा अनेक नांवाने ओळखल्या जाते.त्यांचा जन्म,आई,वडील, त्यांची जन्मभूमी कर्मभूमी,शिक्षण आणि मूत्यू याची नोंद असते.यासर्वाची माहिती मानव कल्याण करणाऱ्या माणसा करिता आणि संस्था करिता प्रेरणादायी असावी या करिता त्यांची माहिती विविध भाषे मध्ये इतिहासात उपलब्द असते. या महापुरुषांची माहिती आजच्या तरुण तरुणीला व्हावी म्हणून काही स्वाभिमानी लोक त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन त्यांच्यावर कथा, कांदबरी,नाटक, सिनेमा,तयार करून त्यांना सर्व समाजा पर्यंत पोचवितात. सध्या जमाना सोशल मिडीयाचा नेट गुगलचा आहे, सैराट सिनेमाने 100 कोटी चा धंदा केला. त्या सिनेमात एक ही प्रसिद्ध कलावंत नाही पण सत्य परिस्थीवर आधारित सिनेमा असल्या मुळे तो देशा विदेशात गाजतोय, त्या सैराट सिनेमातील गाण्यावर आता नवरात्र उत्सवात देवी समोर झिंगाट गरबा खेळल्या जात आहे.त्यातील सर्वच गाणे अर्थपूर्ण आहेत आणि सर्वच वयातील पुरुष महिलांना आपले अंग हलविण्यास मजबूर करतात.कारण विज्ञानाच्या प्रचंड डिजिटल प्रगतीने सर्व क्षेत्र काबीज केली आहेत, तरी भारतातील मानसिक रुग्ण आज ही विज्ञानाच्या अफाट प्रगतीचा परिपूर्ण वापर करून अज्ञान सर्व श्रेष्ठ ठरवीत आहेत.नवरात्र उत्सव हा त्यांचा परिपाक आहे.कोण ही देवी?.नऊ दिवस नऊ रंगाची उधळण व सांज शृंगार करून विशेष सुशिक्षित शाळा,कॉलेज, बँक,न्यायालय, सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या महिलांना पारंपरिक मानसिक गुलाम बनविणाऱ्या उत्साहाने उत्स्फूर्तपणे स्वागत करीत आहेत.असा महिलांना भारतीय संविधानाने दिलेले कोणतेही स्वतंत्र वापरण्याचा अधिकार नाही. त्यांना मनुस्मृती नुसार वागणूक मिळालीच पाहिजे अशी मांगणी करणे चुकीची ठरणार नाही.

कोण ही देवी?.तिचे मूळ नांव काय?.तिचे किती विविध रूपे आहेत?.तिचा जन्म कुठे,कधी झाला?.गांव,तालुका, जिल्हा, राज्य देश कोणता?.तिच्या आई वडिलांचे नांव काय?.तिचे लग्न नेमके कोणाशी झाले होते?.देवीचा पती देवच

असला पाहिजे ?.मग मुले किती होते त्याबाबत माहिती असावी.आणि विशेष कपड्याचा शोध लागला होता काय?.आजच्या सारखे नवरंग त्याकाळी होते काय?.आताच्या अभ्यासक्रमात वाघ,सिंह हे हिंसा प्राणी असतात असे शिकविले जाते,ते आज सत्य आहेच.मग त्या काळी वाघ,सिंह हे पाळीव प्राणी होते काय?.मग देवी कुठे राहत होती?.तेव्हाचे लोक जंगलात राहत होते की मानवाच्या वस्तीत राहत होते?.हे प्रश्न मला दरवर्षी नऊ दिवस रात्रंदिवस सतावतात, ह्या देवीचे शिक्षण किती झाले होते?. देवी कोणत्या प्राथमिक शाळेत शिकली, महाविद्यालय कोणते होते?.कोणत्या क्षेत्रात आर्ट,कॉमर्स,सायन्स मध्ये पदवी संपादन केली होती?.आजच्या काळात या गोष्टीची माहिती असने खूप गरजेचे आहे,आणि ते प्रेरणादायी असते.ती मिळविण्यासाठी प्रयत्न करने हा काही लोकांची जिद्ध असते.म्हणूनच मी दरवर्षी विविध वृत्तपत्रांना हा लेखप्रपंच पाठवीत असतो.

देऊळ बंद ‘,शिर्डी के साईबाबा,जय गजानन हा दिग्गज कलावंत असलेला चित्रपट कधी आला आणि गेला जनतेला कळला नाही.मात्र त्यावर चॅनल पिंट मिडियाने तोंड भरून लिहले,दाखविले.पण स्वामी समर्थ,साईबाबा व गजानन महाराज हया सर्व पात्राचा उल्लेख आला आहे.यांचा जन्म कुठे,कधी व कसा झाला?.गांव, तालुका, जिल्हा, राज्य, देश यांची इतिहासकारांनी इतिहासाची सर्व पुस्तके पालथी घातली तरी या तिघांचा साधा उल्लेखही कुठेच आढळला नाही?. देशाच्या इतिहासात सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,गौतम बुद्ध, कबीर, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा या सर्व संत-महात्म्यांचा जन्म,शिक्षण,कार्य,मृत्यु आई वडीलाचे नांव,गांव,तालुखा, जिल्हा या सर्वाची माहिती मिळते.पण स्वामी समर्थ,साईबाबा व गजानन महाराज यांचा इतिहास भूगोल का सापडत नाही ?.

सम्राट अशोक हयांचा जन्म इसवीसन पूर्व 304 व मृत्यु 232 चा आहे. असा इतिहासात स्पष्ट उल्लेख आहे. शिवाजी महाराजांचा कार्यकाळ इ . स . १९ फेब्रुवारी. १६३० – इ .स. ३ एप्रिल १६८० .तथागत भगवान बुद्ध ह्यांचा कार्यकाळ – इ . स. पूर्व ५६३ ते इ.स. पूर्व ४८३ हा आहे .संत कबीर हयांचा जन्म ईसवी सन 1455 आणि मृत्यु 1575 चा आहे.

संत ज्ञानेश्वरांचा कार्यकाळ इस . १२७५ – इस . १२९६.संत तुकाराम महाराज १६०८ – १६५० दरम्यान या जगात अस्तित्वात होते.(शिवाजी राजांचे समकालीन व गुरु होते).गाडगे बाबा २३ फेब्रु . १८७६ ते २० डिसे . १९५६ हा गाडगे बाबा अस्तित्वात असल्याचा कालखंड आहे.आणि या सर्वांची नावे सुद्धा भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासाला ज्ञात आहेत .

एवढेच नव्हे तर त्यांचा जन्म कोणाच्या पोटी , कोठे आणि केव्हा झाला हे सुद्धा इतिहासाच्या अनेक अभ्यासकांनी कथा,कांदबरी, ग्रंथात नमूद आहे . या सर्व महान माणसांनी आणि संत पुरषांनी केलेले कार्य, गाजवलेले शौर्य आणि माणुसकीची दिलेली शिकवण इतिहासाला साक्षी आहे. ज्या प्रमाणे- भगवान गौतम बुद्ध ह्यांचा जन्म लुंबिनी वनात कपिलवस्तू ( नेपाळ ) येथे राजा शुद्धोधन आणि आई महामाया प्रजापतीच्या पोटी झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी किल्ले शिवनेरी ( जुन्नर ) जिल्हा – पुणे, (  महाराष्ट्र ,भारत ) येथे झाला. तर तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव – तुकाराम बोल्होबा आंबिले त्यांचा जन्म-देहू जिल्हा पुणे (महाराष्ट्र,भारत) येथे झाला.गाडगे बाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव (महाराष्ट्र,भारत) येथे झाला.आणि त्यांचे संपूर्ण नाव – डेबुजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे बाबा.या सर्व महान शूर वीर विवेकी सत्पुरुषांचा आणि विश्वकल्याणाचा विचार करणाऱ्या थोर व्यक्तीमत्वांच्या कार्याच्या आणि अस्तित्वाच्या पाऊलखुणा आपणास मिळतात.तसा या शूर,महापराक्रमी देवीचा नऊ दिवस नवरात्र उत्सव चालतो त्यांचा जन्म,शिक्षण,कार्य,मृत्यु आई वडीलाचे नांव,गांव,तालुखा, जिल्हा या सर्वाची माहिती का मिळत नाही?.

स्वामी समर्थ,साईबाबा व गजानन महाराज हया माणसांचा (देवाचा) जन्म कोठे झाला ?. हया तिघांचे संपूर्णपूर्ण नाव काय होते?.त्यांचा कार्यकाळ कोणता इ स पूर्व कि शतक ?.त्यांचे आई-वडिल नेमके कोण होते ?.आणि ते महान व्यक्तिमत्व आहेत तर इतिहासाच्या पुस्तकां मध्ये किंवा संत साहित्यामध्ये त्यांच्या जन्म मृत्यु आणि कार्याची नोंद का नाही ?.हया प्रश्नांची उत्तर आजच्या तरुण पिढीला मिळाली पाहिजे, कोणाच्या धार्मिक भावना दुःखविन्या साठी हा लेख प्रपंच नाही, माझ्या सारख्या लाखो अज्ञाननी लोकांचे अज्ञान दूर होईल आणि सत्य इतिहास माहिती करीता हा पत्र प्रपंच ज्या चॅनल मीडिया, प्रिंट मीडिया वरील तज्ञांनी या नवरात्र उत्सवा बाबतीत भरभरून लिहले,दाखविले त्यांनी माझा हे अज्ञान दूर करावे हीच नम्र विनंती.

आपला अज्ञानी

सागर रामभाऊ तायडे,
9920403859,(प्रस्तुत लेखक कामगार नेते असून ते असंघाटीत कामगार यांच्या न्याय हक्कासाठीं काम करतात.)
भांडुप मुंबई

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *