कोल्हापूर शहराचा  बौद्ध कालीन तेजस्वी इतिहास…!

कोल्हापूरातील बौध्द कालीन अवशे

कोल्हापूर शहराचा इतिहास प्राचीन आहे तसाच तो गौरवशालीही आहे. जुन्या कोल्हापूर संस्थानाची राजधानी म्हणून ओळख. प्राचीन काळी यालाच करवीर हे नाव होते. कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदिच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. पंचगंगा नदी जवळच ब्रम्हपुरी येथील उत्खननात प्राचीन म्हणजे २००० वर्षापूर्वीच्या वसाहतीचे अवशेष आढळून आले. त्यामध्ये एका बौध्द स्तूपाचे अवशेष सापडले. स्तूप भाजलेल्या विटांनी बांधला असून त्याचा व्यास ८ फूट व उंची ८ फूट आढळून आली. स्तुपामध्ये दगडीपेटी ठेवली होती. त्यामध्ये करंडकात अवशेष होते. पेटीच्या झाकणावर आतल्या बाजूस अशोक कालीन ब्राम्ही लिपीमध्ये ” बम्मसा दानाम धम्मगुप्तेन करितम” हा लेख आढळून आला. त्याचा अर्थ धम्मगुप्ताने दान दिले असा होतो. गौतमीपुत्र सातकर्णी यांचे तांब्याचे नाणे ब्रम्हपुरीला मिळाले आहे. पुढे १८७७ साली कोल्हापूर शहराजवळील उत्खननात धातू शिल्पांचा मोठा साठा सापडला. त्यात बुध्दमुर्ती होत्या, तसेच एक स्तूप व तोरणही आढळले.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात या शहरात बौध्द संस्कृती भरभराटीस आली होती.

बौध्दांकडून दुर्लक्षित व सरकारकडून संरक्षणासाठी उपेक्षित पोहाळे लेणी

पोहाळे गावातील लेणी पोहाळे पांडवलेणी या नावाने तेथील स्थानिकात प्रचलित आहे.
ही लेणी थेरवादी परंपरेतील आहे. या लेणीत एक चैत्य सभागृह व छोट्या खोल्या ( cell ) पहावयास मिळतात.
इतर बऱ्याच लेण्यांप्रमाणे या लेणीलाही अतिक्रमणाने ग्रासले आहे.

मसाई पठार व पांडवदरा लेणी – येथे सुध्दा आपलाल्या थेरवादी परंपरेतील लेण्या पहावयास मिळतात. ही लेणी सुध्दा पन्हाळा तालुक्यात येते.

या लेण्यांबद्दल तसेच ब्रम्हपुरी येथे झालेल्या उत्खननाबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. या लेण्यांना Archeology Department ने संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले असले तरी याबद्दल म्हणावी तितकी जागरूकता किंवा संरक्षण नाहीये. या लेण्यांवर संशोधन व्हावे, त्यांना संरक्षण प्राप्त व्हावे आणि त्यांचे जतन व्हावे ह्या करिता ही त्रोटक माहीती देत आहे.

पोहले लेनी – बुद्धिस्ट अर्चेओलोगिकल साईट
pohale ghat, Wadi Ratnagiri, Maharashtra 416229
https://goo.gl/maps/3Fx8FL845kt

Masai Plateau
महाराष्ट्र 416230
https://goo.gl/maps/Zqo1uNCDiu52

पन्दव्दारा लेनी
बदेवादी, महाराष्ट्र 416213
https://goo.gl/maps/Fjo4Gt4GUBU2

  • अरविंद भंडारे
    पालि रिसर्च इन्स्टिट्यूट

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *