कोकणातील गाडगेबाबांना राजकारणांच्या पुढे जाऊन निवडून द्यावे

कोकणातील गाडगेबाबा ,गावागावात जाऊन त्यांच्यात प्रबोधन करून समाजाला व्यसन आणि अंधश्रद्धा याच्या पासून परावृत्त करणे,लग्नात कोणताही बडेजाव ना करणे ,समाजातील रूढी परंपरा यांचा शास्त्रीय भाषेत मगोवा घेणे ….!
जातीयता ,धर्मांधता यावर प्रहार करत खऱ्या माणुसकी धर्माची माहीती देणे .

कोकणातील कुणबी बांधवांना त्याच्या लग्नपद्धतीत बदल करण्यास लावणारे आणि कोकणात मोठ्या प्रमाणात असणारा कुणबी समाजाचे आदराचे स्थान निर्माण करणारे माननीय काका जोशी .त्यांना कोकणात आदराने कोकणचे गाडगे बाबा म्हणूनही ओळखले जाते.

एक निःस्वार्थी माजी सनदी अधिकारी असलेले जोशी काका रत्नागिरी जिल्झ्यात प्रसिध्द आहेत.

कोकणात तसे कुणबी समाजाला अजुन ही नेतृत्व मिळालेले नाही . विविध संघातना यावर काम करत आहेत मात्र बहुजन समजल्या जाणाऱ्या या obc वर्गाचा आवाज लोकसभेत म्हणावा तसा गाजला नाही .

आत्ता पर्यंत विविध पक्षात कुणबी समाजाचे लोक काम करत आहेत .विविध पदे ही त्यांना मिळत आहेत पण त्यांना संविधानिक पद्धतीने कोणताच पक्ष न्याय देत नाहीय .

जे मोठे होतात तेच मग राजकारण करत असतात सर्वसामान्य जनता आहे तशीच .

जी अवस्था कुनबी समाजाची तीच अवस्था कोकणातल्या बौद्धांची तिथे ही हाच वणवा .

विविध मागण्या साठी विविध पक्षांच्या आश्रयायला जाऊन आपल्या मागण्या साठी हातपाय पसरायला लागतात आपल्या हक्काचा खासदार निवडलाच जात नाही .त्यात कोकणातील समाजकल्याण खात्याचा निधी बऱ्याच ठिकाणी दुसरीकडे वळविण्यात आला आहे आणि हे वर्षानुवर्षे बिनभोट चालू आहे .
कारण सत्ता ही त्यांचीच आणि विरोधक ही
त्यांचेच इथल्या बौद्धांचे आणि ओबीसी चे मागणे मान्य कोण करतो ?

मात्र या वेळी अड प्रकाश आंबेडकर यांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडीने कोकणातील #जोशी काकांना उमेदवारी देऊन कोकणच्या लोकांच्या परिवर्तनाची चावी दिली आहे .

मा जोशी काकांना कोकणातिल कुणबी आणि बौद्ध समाजाचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा करूया .
-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *