कॉंग्रेसला वगळून केलेली वंचितांची महा आघाडीच देशाला वाचवू शकेल

 

कॉंग्रेसला वगळून केलेली वंचितांची महा आघाडीच देशाला वाचवू शकेल

 

भाजप येईल , भाजप येईल…म्हणे एमआयएम आणि मनसे नको ….अरे जाती जातीत , धर्मा-धर्मात , प्रान्ता-प्रांतात तुम्ही आगी लावायच्या आणि त्या विझवायला दलित-मुसलमानांची ढाल करायची ? भाजप आणि तुमच्या नीतीत काहीही फरक नाही. तुम्ही एकच आहात. तुमचा उल्लू सिद्ध करण्यासाठी दलित_मुसलमानांना, बहुजनांना भीती दाखवू नका.

भाजप असो कि कॉंग्रेस त्यांनी समाज म्हणून ना मराठ्यांना न्याय दिला ना ओबिसीला. मग किती दिवस त्यांनी तुमच्या पालखीचे भोई म्हणून तुमच्या मागे मागे राहायचे ? आणि किती दिवस लांडगा आला रे आला सांगून तुम्ही समाजा समाजात भांडणे लावून सत्तेत येत राहणार ? एक तर मुळातच #काँग्रेसच्या नाकर्तेमुळे भाजप देशात आली आणि त्याची विषारी फळे नाहक तुमच्यामुळे जनतेला आज भोगावी लागत आहेत आणि त्याचे खापर दलित_मुसलमानांवर फोडायला तुम्हाला लाज नाहीत वाटत ? किती दिवस लोकांना भीती दाखवत राहाल ? आता आली तर येऊ द्या भाजप.

दलित_मुसलमान आपले संरक्षण करण्यास समर्थ आहेत. तुमच्या कुबड्यांची त्यांना गरज नाही.

कॉंग्रेसला वगळून केलेली वंचितांची महा आघाडीच देशाला वाचवू शकेल. लोकांनी या लबाड कोल्ह्यांच्या कोल्हेकुईला भिक घालू नये.
किती दिवस दलित मुस्लीम आणि बहुजनांनी तुमची घरे भरायची ?

सविस्तर लवकरच….

-बाबा गाडे

वरिष्ट पत्रकार आणि संपादक दै महानायक औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *