कल्याण पूर्व वालधुनी येथील ‘बुद्धभूमी’ च्या आवारात भव्य बुद्धमूर्तीचे अनावरण…!

म्यानमार येथून गेल्या काही दिवसांपासून अथक प्रयत्न करून कल्याणात आगमन झालेल्या तथागत बुद्धांच्या या १२ फूट उंचीची आणि १३ टन वजनाची शुभ्र संगमरवरी दगडाची ही विशालकाय मूर्तीचे अनावरण काल मनुस्मृती दहन दिन अर्थात महिला मुक्ती दिन महाड ,बुध्द रूप स्थापना दिन ,धम्मभूमी देहूरोड नाशिक आणि ओबीसी धम्म दिक्षा वर्धापन दिन कल्याण या दिनाचे औचित्य साधून वालधुनी च्या बुद्धभूमी परसरात म्यानमारहुन आणलेल्या बुद्धरूपाचे उत्थापन व स्थिरीकरण सोहळा साजरा करण्यात आला .
कल्याण परिसरात अत्यन्त महत्त्वाचे आणि धम्म प्रसार आणि प्रचाराचे प्रमुख केंद्र म्हणून बुद्धभूमी ओळखले जाते.

मुंबई परिसरात मध्य रेल्वेलगत आणि सर्वात मोठा परिसर असणारी ही भूमी .

“बुद्धभूमी फाऊंडेशन” चे आदरणीय भदंत गौतमरत्न आणि त्यांचे सहकारी भुक्खू संघ आपल्या अफाट कष्ट करून हा परिसर जतन करत आहेत .परिसरातील अनेक भु-माफिया ही अत्यंत मोक्याची जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत होते व आहेत मात्र त्या सर्वांशी पूर्ण ताकतीने हे धमम्माचे सैनिक लढत आहेत.

कल्याण-ठाणे -मुंबई परिसरातील बऱ्याच धम्म बांधवांनी”बुद्धभूमी फाऊंडेशन” ला धम्मदान करून मोलाचे सहकार्य करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आत्ता कल्याण हे जागतिक बौद्ध केंद्र म्हणून ओळखले जाईल.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय भन्ते येथे येऊन जागतिक धम्मपरिषद पार पडली होती.
“बुद्धभूमी फाऊंडेशन” बुद्धभूमीत विविध महत्त्वाचे उपक्रम उभारत असून त्या सर्व उपक्रमांना आर्थिक सहकार्याची मोलाची गरज लागत आहे .आपल्या परिसरात एक महत्त्वाचे धम्मकेंद्र म्हणून उदयास येणाऱ्या या धम्मकेंद्रास आपण सर्वांनी धम्मदान करावे असे आवाहन ही जनतेच्या वतीने करण्यात येत आहे .

-विनोद पवार-कल्याण
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *