एल्गार मोर्चा यशस्वी…लाखो भीमसैनिकांची उपस्थिती..!

आज दि. 26मार्च 2018 कोरेगाव  भीमा येथिल दंगलीला जबाबदार असणार्‍या संभाजी भिडे यांच्या अटकेकरीता तसेच राज्यात वाढता दलित अत्याचार व शिक्षणातिल भ्रष्टाचार विरुध्द एल्गार मौर्चाचे आयोजन भारिप बहुजन महासंघाचे राष्टिय अध्यक्ष आद.प्रकाश आंबेडकर यांनी व विविध सामाजिक व राजकिय संघटनांवतीन आयोजित करण्यात आला होता .जवळजवळ लोखो भीमसैनिकांनी या एल्गार मोर्चाला आपली उपस्थिती दाखवली, महाराष्टाच्या कानाकोपर्‍यातुन या मोर्चाला कार्यकर्त्ये जमा झाले होते.

बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ।

या आवेशपुर्ण घोषणानी परीसर दुमदुमुन गेला होता.जवजवळ ४०% च्या उष्णामय वातावणात भर तळपत्या सुर्याला डोक्यावर घेत भिमसैनिक शिस्त,संयम अन उपाशीपोठी आपल्या अस्तित्वासाठी एकत्र आले होते.बाळासाहेब आंबेडकर यांनी या मोर्च्यादर्म्यान शासनाकडे संभाजी भिडेला अटक करण्याची जोरदार मागणी केली जर आठ दिवसात संभाजी भीडेला अटक केली नाही तर पुन्हा आम्ही विधानभवनाचा ताबा घेवु, असा गर्भित ईशाराही फडणवीस सरकारला दिला असुन कुणी आम्हाला कमजोर समजु नये. आम्ही मनात आणले तर मोदी ला ही खाली खेचु शकतो.असे ही ते म्हणाले…

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *