एक नव्या बदलाची सुरुवात.…!

एक नव्या बदलाची सुरुवात.…!

उदया मुंबईत वंचितांचा ऐतिहासिक शिवाजी पार्क वर महामेळावा होत आहे .महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि तमाम बहुजनांचे नेते मा अड प्रकाश आंबेडकर आणि ऐमी चे बॅरिस्टर ओवेशी या मेळाव्याचे नेतृत्व करणार आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात भिंगरी प्रमाणे फिरून अड प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे .आपली भूमिका मांडून ते कार्यकर्ते आणि सामान्य माणसांच्या प्रश्नाला हात घालत आहेत.

प्रस्थापित राजकारण्यांनी कसे विविध वंचित समाजाला मुख्य प्रवाहाच्या बाहेर ठेवले हे पटवून सांगत आहेत.महाराष्ट्रातिल बहुजन हा वंचित असून ही त्याला त्याच्या वंचित असण्याची जाणीवच नसल्याने तो कसा शक्ती हीन झाला असून त्याला आता जाती जाती च्या कुंपणा तुन बाहेर येत एकत्र लढावे लागेल या साठी ते आपली भुमिका सातत्याने मांडत आहेत.

विविध वंचित समाजाचे लोक त्यांना अधिकाधिक साथ देत असून त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत .मुस्लिम,आदिवासी ,कोळी,आगरी,वंजारी,कैकाडी,तेली ,माळी, धनगर ,बौद्ध,चर्मकार,मातंग आदी अनेक जातीतील लोक एकदिलाने त्यांच्या मागे उभे राहत आहेत.

उद्याचा सभेत येणारा वर्ग हा तरुण आणि वंचित भावनेने भारावलेला असेल.
रिपब्लिकन चळवळीतिल काहीं गट तट यात उघडपणे सामील नसतील पण त्यांचे कार्यकर्ते आणि जनता उद्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणार हवेत .

नेहमी 6 दिसेम्बर आणि धम्म प्रवर्तन दिनाला लोटणार जन सागर प्रथमच आपल्या न्याय आणि हक्काची जाणीवान साठी एकत्र येणार आहे .

उद्या च्या मेळाव्यात ओबीसी हक्क मेळावा म्हणून ही संबोधले आहे .मुंबईतील खऱ्या भूमीपुत्राच्या हक्काचा लढा याच मुंबईतील एक महापुरुषांचा नातू लढत आहे ही ऐतिहासिक घटना असून आता नव्या बदलाची ही सुरुवात आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये .

-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *