उद्योग उर्जाने केले ‘गोपाळ इंटरप्रायजेस’ च्या मान. सचिन शिर्केना सन्मानित “

नव्याने उद्योजक होणाऱ्या ना आणि ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना एक नवे व्यासपीठ उभे करणारे डोंबिवली येथील जगप्रसिद्ध जादूगार मा.अभिजित आणि जाहिरात क्षेत्रात प्रसिद्ध असणारे मा.निलेश आणि असे बरेच मान्यवर यांनी एकत्र येऊ उद्योग ऊर्जा नावाचा व्यावसायिक कट्टा गेल्या कित्येक वर्ष चालवत आहेत त्यात बरेचसे नवे जुने उद्योजक भाग घेतात आपल्या व्यावसायिक गरजा आणि अडचणी मांडत असतात त्यात उद्योग उर्जा मधील अनुभवी उद्योजक त्यांना मार्गदर्शन करतात .त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या अनुभवात नवोदित भर घालतात.
याच प्रमाणे बदलापूर येथील नवोदित उद्योजक आणि FMGC प्रॉडक्ट चे मार्केटिंग चे अनुभवी मा. सचिन शिर्के यांना सन्मानित केलेय.
त्यांनी दिलेल्या एका मिनिटाच्या प्रभावी व्यवसायिक परिचयाने कट्ट्यावरील मान्यवर प्रभावित झाले .

मा. सचिन शिर्के कोण आहेत ?

सचिन शिर्के हे गेल्या 15 वर्ष विविध आघाडीच्या देशी विदेशी कंपनीच्या FMGC प्रॉडक्ट चे सेल्स आणि मार्केटिंग पाहत होते.आत्ता त्यांनी स्वतःचे GOPAL नावाने होऊसकीपिंग प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणले आहेत.GOPAL ENTERPRISE नावाची कंपनी ते चालवत आहेत .आपल्या अनुभवाच्या आणि ओळखीच्या जोरावर ते मार्केट मध्ये आपला ब्रँड उभा करत आहेत .विशेष म्हणजे सचिन शिर्के हे OURPEOPLE Media चे Business Development Consultant आहेत .
-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *