आपल्या सहचारिणी ला उद्योगातून स्वावलंबी करणारे व्यक्तीमत्व म्हणजे मा.सिध्दार्थ तपासे – सोबत उद्योजिका मा.सारिका तपासे यांच्याशी www.ambedkaree.com ची दिलखुलास बातचीत-

चळवळीतील एक कार्यकर्ता आपल्या नोकरी आणि इतर प्रापंचिक प्रश्न असूनही सतत व्यवसायाचा विचार करतो आणि आपला समाज व्यवसाहिक बनला पाहिजे आणि या साठी केवळ लेखणी ,चळवळ व फुकटचे व्याप न करता आपल्या निश्चित ध्येयाकडे बघून अवडीच्या क्षेत्रातील व्यवसाय करावा त्याच बरोबर समाजात ही व्यावसायिक बदल व्हावा म्हणून स्वतः कार्यरत राहणे व स्वतःचा व्यवसाय प्रगतीवर ठेवणारे व्यक्तीमत्व म्हणजे मा सिद्धार्थ तपासे.

नेहमी बोलले जाते की यशवंत पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो हे खरे ही आहे तास तो महान इतिहास ही आहे पण आपल्या सहचरिणीला अर्थात मा.सारिका तपासे मॅडम याना अर्थिक स्वावलंबी बनवणे व समाजात एक आदर्श निर्माण करण्यासाठी ‘”जिटोर्मा”नावाने डिझायनर मेणबत्या बनवण्याचा स्वतंत्र व्यवसाय उभारण्यास प्रचंड मेहनत घेत आहेत .आपली कंपनी कमी वेळात प्रामाणिकता आणि दृढ निश्चयाने दर्जेदार उत्पादन बाजारात उपलब्ध करू शकतो यासाठी लागणारे कष्ट दिवसरात्र करून आपल्या सहचरिणीला व्यवसायात उभे करण्यात मदत करतात .

जिटोर्मा कैंडल्सच्या मुख व्यवस्थापिका आणि नव्याने स्वावलंबी बनणाऱ्या मा.सारिका तपासे मॅडम म्हणतात की
त्याच्या याच मेहनतीने मी आज स्वावलंबी पणाने उभी आहे . तेच माझे प्रेरणास्थान आहेत असेही त्या म्हणाल्या पुढे www.ambedkaree.com शी बोलताना त्यांनी आपल्या या प्रवासात आंबेडकरी समाजाला उध्योजक मानून उभे करण्याचे काम राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे जेष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे आणि त्यांचे कार्यकर्ते जे मार्गदर्शन करतात ते अत्यंत मोलाचे आहे असे ही त्या म्हणाल्या पुढील प्रवासात कुणी कोणी कशी मदत केले कुणी कसे मार्गदर्शन केले हे ही www.ambedkaree.com शी बोलताना सांगितले ते असे ,
विविध वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथील तीन दिवसीय NSIC द्वारा आयोजित बिझनेस एक्सपो चा समारोप झाला.
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते यांची मेहनत व जेष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे सर, विजय वाघमारे सर्, निखिल मेश्राम सर, विनीत बनसोडे सर व आमच्या साठी अखंड मेहनत घेणारे विजय जाधव सर यांच्यामुळेच घरातील सर्व सामान्य गृहणी ते वर्ल्ड ट्रेड सेंटर मधील एक गृहणी असा केवळ आठच महिन्याचा उद्योग प्रवास स्वप्नवत असाच आहे.या प्रवासात सर्व मान्यवर आम्हाला दीपस्तंभ सारखे राहिले .

वर्ल्ड ट्रेड सेंटर १५० स्टॉल मध्ये बरेच स्टॉल आमच्या REDPN चे होते. हा अनुभव आम्हाला नवी ऊर्जा, नवी प्रेरणा देणारा ठरला. येथे आम्ही केवळ विक्री कौशल्यच शिकलो नाही तर आम्हाला व्यवसायाच्या नव्या संधि आमच्या कड़े चालून आल्या. झि टीवी चे मालक सुभाष चन्द्र यांचे विचार एकण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात त्या सुभाषचंद्र याना एकण्या भेटण्या चा योग केवळ डॉ हर्षदीप कांबळे सरांच्या मुळे आम्हाला आला. वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या संचालिका श्रीमती नाइक मैडम यानी केवळ आमच्या स्टॉल भेटच दिली नाही तर आमच्या कैंडल्स ची प्रशंसा ही केली. उद्योग मंत्री सुभाष देसाईं हे आम्हाला भेटले. उद्योग विभागाचे लोंढे सर, DIC चे जावळे सर् यांचे ही मार्गदर्शन आम्हाला लाभले.

एकंदर च्या या प्रवासात ज्यांनी मदत आणि मार्गदर्शन केले व अजूनही करत आहेत त्यांचे ही त्या मानापासून आभार व्यक्त करतात .आपण कितीही मोठे झालो तरी आपणास उभे करणाऱ्याला विसरू नये .हे ही त्या आवर्जून बोलतात .

सिद्धार्थ तपासे हे जे व्यक्ती म्हणून आम्ही जवळून पाहिले आणि त्यांची मेहनत समाजाप्रती तळमळ ही अनुभवली त्याच प्रमाणे ते आपल्या सहचरिणी सारिका तपासे याना एक नव्या व्यवसायात उभे करत आहेत हेच आर्थिक चळवळीचे योगदान आहे .

सारिका तपासे यांच्याशी सहज गप्पा करताना त्यांनी आपल्या डिझायनर मेणबत्या बद्दल माहिती सांगितली ती अशी किमान 30 रुपये ते कमल 500 रुपये किमतीच्या डिझायनर मेणबत्यांची बाजारपेठ मागणीनुसार बनवतात .महाराष्ट्र आणि देशभरातून त्यांच्या मेंबत्याना मागणी आहे .नुकत्याच त्यांनी बनवलेल्या जिटोर्मा कैंडल्स थॅलॅन्ड आणि मलेशिया येथे ही एक्सपोर्ट केल्यात .

महाराष्ट्रात महत्त्वाच्या शहरात त्यांच्या जिटोर्मा डिझायनर कांडल्स ची मागणी आहे . दिवसेंदिवस ती वाढतच आहे कधी कधी मागणी पेक्षा पुरवठा कमी होतो इथे आपण मागे पडतो याची ही खंत त्या करतात.
राज्यातील विविध व्यवसाहिक प्रदर्शनात व कार्यक्रमात ते आपला सहभाग घेत असतात नुकत्याच नाशिक येथील एक व्यवसाहिक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला असे ही त्या म्हणाल्या.

महिला सक्षम होण्यासाठी जशा त्या इच्छुक असतात तशी त्यांना त्यांच्या घरातील लोकांनी ही साथ देणे गरजेचे आहे तरच आपण त्यागमूर्ती माता सावित्री आणि रामाईंच्या लेकी म्हणून ओळख निर्माण करतील .

एकूणच मा.सिध्दार्थ तपासे सर आणि त्यांच्या सहचारिणी मा.सारिका तपासे मॅडम याना भेटुन खूप प्रेरणादायी वाटले.
शब्दांकन – शीतल प्रमोद जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *