केंद्रीय मंत्री ना.आठवलेंना मारहाण सर्वच थरातून निषेध.….!

अंबरनाथ बदलापूर मध्ये कडकडीत बंद

अंबरनाथमध्ये केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुमेध भवार युथ फेडरेशन आयोजित संविधान गौरव आणि भीम महोत्सव कार्यक्रमासाठी अंबरनाथमध्ये गेले होते. कार्यक्रम संपल्यावर स्टेजवरून उतरत असताना त्यांच्या दिशेने एक तरूण धावत गेला आणि त्यांना धक्काबुक्की केली. रामदास आठवलेंना धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला आरपीआयच्या कार्यकर्त्यांनीही चोप दिला. या तरूणाने धक्काबुक्की का केली? हे अद्याप समजू शकलेले नाही. अंबरनाथमध्ये या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या तरूणाने आठवलेंना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. आठवले यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ते यांनी या तरूणाला बाजूला खेचले. जे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते त्यांनी थेट चोप द्यायला सुरुवात केली. या सगळ्यामध्ये हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत.

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *