आठवणीतले अटलबिहारी….

आठवणीतले अटलबिहारी….
बालपणापासून संघभक्त असणारे अटलबिहारी वाजपेयी संघाला आपला आत्मा मानायचे. आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी “बुद्ध पौर्णिमेच्या” दिवशी घेतलेली “पोखरण अणू चाचणी” ,”कारगिल युद्ध” आणि खासकरून “घटना-समीक्षा”असे अनेक पराक्रम केले होते. मात्र सरकारला पुढे करून अत्यंत चलाखीने संविधान बदलण्याच्या संघीय कारस्थानाला तत्कालीन “राष्ट्रपती के. आर. नारायणन” यांनी मोठा खो दिला होता.त्यामुळे घटना समीक्षा आयोग स्थापन करूनही त्यांचे आणि संघाचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यांचे हे पराक्रम संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. देशाच्या कायम स्मरणात राहील असे हे व्यक्तिमत्व आहे.
त्यांच्या जाण्याने संघ विचारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षापासून ते रुग्णशय्येवरच होते. त्यांचे कुठलेही अलीकडचे चित्र जरी केले जात नव्हते. आपल्या भाषणातून ते कायम लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे असा आग्रह धरायचे.
अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. १९९८ मध्ये ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे सरकार 13 महिने टिकले. त्यांची तिसरी पंतप्रधानपदाची कारकिर्द मात्र पूर्ण मुदतीची होती.
-बाबा गाडे-
जेष्ठ पत्रकार
आणि
संपादक दैनिक “महानायक” औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *