आंबेडकरी विचारांना व भूमिकांना दडपणारा नाझिवाद …..! -भिम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद याना अटक

ज्या महामानावांच्या लेखणीने तमाम भारताला लोकशाही प्राप्त झाली त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयाना सरकार आपल्या मर्जी नुसार वाटेल तो अन्याय करून आपण कसे नाझीवादी आहोत हे सिद्ध करत आहे .

भीमा कोरेगाव विजय दिवस केवळ काही तासांवर येऊन ठेपला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद याना व त्यांच्या कार्यकर्ते याना मुंबईत चैत्यभूमी वर अटक केलीय .

सध्या भीमा कोरेगाव प्रकरणात सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोलयुद्ध चालू आहे पोलीस यंत्रणा आणि सरकार यावर मोठा वर्ग सरकारच्या भूमिकेच्या विरोधात लिखाण होत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्याने तमाम शोषित पीडित वर्गाला न्याय मिळाला .त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी म्हणून सनदशीर मार्गाने क्रांतिकारी बदल करणारे महामानव व यांचा आदर्श कायम स्मरणात असणारे त्यांचे अनुयायी याना अशाप्रकारे दडपले जात आहे .

समाजात जाती जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या सनातन आणि कित्येक नाझीवादी संघटनांच्या प्रमुखांना खुलेआम सोडणाऱ्या सरकारने केवळ आंबेडकरी विचारधारा मांडणाऱ्या नेत्यांना जेरबंद करून आपण काय व कोण आहोत याची प्रचिती दिली आहे .

तमाम आंबेडकरी समूहाने आत्ता लोकाशाहीच्याच माध्यमातून या सर्व नाझीवादी पक्षानं धडा शिकवावा या साठीं एकत्र यावे असे वाटते .
चंद्रशेखर आझाद यांच्या अटकेचा जाहीर निषेध विविध स्तरावर केला जात आहे .सरकार आंबेडकरी विचारधारेला घाबरत असून ही विचारधारा दडपण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे.
-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *