आंबेडकरी नेतृत्वाने लाचारी आणि हुजरेगिरीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवे .

आंबेडकरी नेतृत्वाने लाचारी आणि हुजरेगिरीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवे .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी देशभर करोडोंच्या संख्येने आहेत दिवसांगणिक त्यात लाखोंची भर पडत असते ज्या व्यक्तीने महामानवांचे विचार वाचले ,अभ्यासले की यी व्यक्ती महामवांचा अनुयायी होतो त्याला जातीचे, धर्माचे ,प्रांताचे वा देशाचे बंधन राहत नाही.

ज्ञानाच्या या उतुंग शिखरकडे पाहताना आपली छाती अधिकाधिक रूद होते. ज्या समाजाने अवहेलना ,अपमान,अस्पृश्यता,विषमता अन्याय याचा पिढ्यानपिढ्या सामना केला त्याच समाजाला या भीषण गर्तेतुन बाहेर काढुन त्यांना स्वाभिमान,प्रेरणा आणि ताठ मानेने जगण्यास शिकवले .

गेल्या कित्येक पिढ्या विकासास आणि ज्ञानास वंचित होत्या पण महामंवांचा या क्रांतिकारी संघर्षाने आज करोडो अनुयायी केवळ 70 वर्षे च्या कमीत कमी कालावधीत जगभर आपला ठसा उमठवू लागलेत असे कोणतेच क्षेत्र नाही तिथे आंबेडकरी अनुयायी पोहचू शकले नाहीत.या मागे महामानवाचीच प्रेरणा आणि सामर्थ्य.

भारतीय लोकशाही बहाल करताना महामानव, व्यक्ती स्वतंत्र आणि त्याहीपलीकडे स्वाभिमानाला जास्त किंमत देतात याचा विचार केला तर भारतीय राजकारणात आंबेडकरी राजकारण्यांची सतत पिछेहाड होत असते मात्र हे स्वाभाविक आहे .हजारो वर्षांची मानसिकता बदलण्यास अजूनही काहीं काळ लोटेल पण या मानसिकतेवर मात करण्याची असेल तर आपणाला निश्चित असा कार्यक्रम उभा करावयास हवा. आंबेडकरी विचारधारा ही तमाम पिढीत वंचितांची विचारधारा व्हायाला हवी .देशात जो बहुजन वर्ग आहे त्याची ती विचारधारा आहे . हे सिद्ध करण्यासाठी आपणास त्याच प्रकारे ती समजावून आणि प्रत्यक्षात अमलात आणावयास हवी .

देशातील आंबेडकरी विचारांचे नेतृत्व हे तसे असले पाहिजे करोडोंच्या संख्येने असलेल्या समाजाचे नेतृत्व ही विखुरलेले आणि अस्तिर असलेले आहे .

कोण कुठे आणि कुणाच्या तरी दावणीला बांधलेले आहे .त्या नेतृत्वाची निश्चित अशी भूमिका नाही .त्यामुळे देशपातळीवर आणि राजपातळीवरही राजकारणात आंबेडकरी पक्षाना किंमत शून्य महत्त्व दिले जाते . हे थांबववायचे असेल तर आंबेडकरी नेतृत्वाने आपले स्वभाव गुणधर्म बदलले पाहिजेत .

कोणत्याही व्यवस्थेला उधळून टाकायचे असेल तर आपल्या विचारावर आणि मतावर ठाम असले पाहिजे त्यात कोणतीही अस्तिरता आणि फायदा तोट्याचा विचार नसला पाहिजे आणि नमके स्वतःला आंबेडकरी विचाराचे म्हणवणारे काही राजकीय नेते आपल्या वैचारिक दिवळखोरीने आपली किंमत करून घेत आहेत .

जर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्फुर्तीचे ,विद्रोहाची आणि स्वाभिमानाचे प्रेराणा स्थान आहेत तर त्यांचा वारसा आणि नावने राजकारण करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी आपले स्वाभिमान गहाण ठेऊन एक एक जागेसाठी लाचारी करणे आणि याचकासारखे पत्रकार परिषद घेऊन मागणी करणे म्हणजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी राजकारणाची हेटाळणी करण्यासारखे आहे .

आपण किमान राजकारणात निवडणूक जिकू शकत नसू पण आपलीं उपद्रव मूल्य कमी करू नये .किमान हे गणित जरी या आंबेडकरी विचारांच्या नेतृत्वाने विचार केला तरी ही खूप काही करू शक्यतो पण हे समजणार कोण….?

ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्शचा सतत उद्घोषणा करणाऱ्या तमाम राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने जर स्वाभिमानी आणि निःस्वार्थी पणाचे राजकारण केले व तसे करणाऱ्या आंबेडकरी नेतृत्वाखाली काम केले तर आंबेडकरी विचाराचे स्वाभिमानी राजकारण करता येऊ शकेल अन्यथा केवळ हताशपणे पत्रकार परिषदा घेऊन आपले हसे करू नये .

-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

दलित चळवळीची बदनामी का ?

मंगळ फेब्रुवारी 19 , 2019
Tweet it Pin it Email दलित चळवळीची बदनामी का ? नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी दलित चळवळ आणि साहित्यामुळे जातीभेद कायम राहिल्याचे अजब वक्तव्ये करुन चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे तो निंदनीय आहे. साहित्य संमेलना प्रमाणे, नाट्य संमेलन वादग्रस्त ठरवून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गज्वींनी असे चळवळीवर आरोप तर केले […]

YOU MAY LIKE ..