अर्क -एका हिंदकेसरी पैलवानाविरुद्ध एका नवख्या पोराची झुंज आहे..

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकतील.. किंवा हरतील.. पण या आघाडी मुळे एक झालंय.. दलित नेता म्हटले की 1 जागा सोडली की संपूर्ण आंबेडकरी मते डोळे झाकून आपल्या पक्षाला पडणार हे निश्चित होते.. आणि लाचार नेते तसच करत होते.. हे चित्र कुठेतरी बदलतंय..!
स्वतः पुरती 1 जागा मिळाली की हे निघाले समाजाचा सौदा करायला.. 2019 च्या निवडणुकीसाठी तर काहीजण 1 जागेसाठी अक्षरशः भीक मागत होते.. पण BJP ने ती पण दिली नाही.. मग गुमान लाचार होऊन गपघार बसले (अन ते VBA वर टीका करतात..)
पण VBA मुळे परस्थिती बदलली.. कालपर्यंत राजकीय पटलावर कुठेही नसणारे समूह आणि त्यांचे नेते यांना महत्व प्राप्त झालेय.. कमीत कमी त्यांचा विचार केला जातोय.. कालपर्यंत कुणाच्या खिजगणतीतही नसलेल्या नावावर आज debate होत आहेत.. मेडिया मध्ये कधीच नसणारे लोक आज वॉर रूम च tempreture changer ठरताहेत..!
आणि हे बघून कोणी याना BJP ची टिम B म्हणताहेत.. आता तसे पाहिले तर मग UP मध्ये SP-BSP हे एकत्र bjp ला फाईट देत असताना; तिथे SP-BSP विरुद्ध उमेदवार देणाऱ्या काँग्रेस ला BJP ची team B का म्हणू नये..??
लाखा लाखाच्या, गर्दीचे उच्चांक मोडणाऱ्या सभा पाहून यांनी या सभा स्पॉन्सर्ड आहेत असा जावईशोध कुणीतरी लावला.. अरे पण तुम्हाला माहितेय का लोक 100 rs पासून लाखाच्या देणग्या देत आहेत स्वतःहून.. पोरीच्या लग्नाला साठवलेले पैसे देत आहेत.. आया-बाया सोन्याचे दागिने देत आहेत काढून.. या सभांची स्पॉन्सरशीप इथून येतेय..!
मोदी आणि BJP चे वाभाडे काढणारा माणूस, RSS च्या शस्त्रपूजनातून AK47 सारखी हत्यारे लोकांसमोर आणणारा माणूस.. केंद्रीय मंत्रिपद नाकारणारा माणूस.. राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारणारा माणूस.. किती तरी लाभाची पदे SC, ST, OBC मध्ये वाटून स्वता विरक्त राहणारा माणूस.. त्यांचे पैसे घेऊ शकतो का हा विचार करा जरा??

आजही हा मानुस वडापाव खाऊन, रेल्वे, बस ने प्रवास करून राजकारणात प्रवाहाबाहेरच्या लोकांना स्थान मिळावे म्हणून झटतोय..
अन त्याच्या प्रामाणिक पणावर तुम्ही चिखल उडवताय..!! Shame..

आता मताचे विभाजन टाळण्यासाठी मग काँग्रेस शी युती का नाही केली हा जर सवाल असेल तर इथं सांगावेसे वाटते.. की काँग्रेस ने प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले मधला फरक समजून नाही घेतला.. 1जागा देऊन गुंडाळणाचा प्रयत्न असेल त्यांचा.. पण प्रकाश आंबेडकर सगळ्या वंचितांची बाजू मांडत होते.. त्यांना उमेदवारी द्या.. हा मुद्दा जास्त ताकदीने मांडत होते… अन ते काँग्रेस सारख्या प्रस्थापित पक्षाला मान्य नव्हते..!
शेवटी प्रकाश आंबेडकर आणि इतर दलित नेत्यांमध्ये फरक तर आहेच ना.. तो महत्वाचा फरक म्हणजे *स्वाभिमान..! कारण मागेच प्रकाश आंबेडकर इतर दलित नेत्यांना म्हटले होते “तुम्ही आंबेडकर विकू शकताय.. पण मला तो ही विकता येत नाही कारण माझं रक्त आहे ते..”
.

शेवटी VBA च्या किती जागा येतील हा प्रश्न गौण आहे.. कारण प्रस्थापित धनिक पक्षाविरुद्ध एका नव्या पक्षाची सुरुवात आहे ही.. एका हिंदकेसरी पैलवानाविरुद्ध एका नवख्या पोराची झुंज आहे..

तरीही या नव्या आघाडीने तुमच्या नाकात दम आणलाय.. हक्काच्या मतदारसंघातही तुम्हाला असुरक्षित करून टाकलंय.. बालेकिल्ल्यात तुम्हाला देशाच्या राजकारणात मुरलेल्या नेत्याला भावनिक साद द्यावी लागतेय.. देशाच्या माजी गृहमंत्र्याला, राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला थेट त्याच्या होमग्राऊंडवर आव्हान देने..अन त्यातही त्याला असुरक्षित वाटणे.. यातच सगळे आले..!!
#बाकी VBA ने सगळ्या जातीसमूहाना उमेदवारी दिली आहे..
त्यात धनगर, माळी, तेली, मराठा, बौद्ध, मुस्लिम, लिंगायत असे सगळे वंचित आहेत.. ज्यांना आज पर्यंत कुणीच विचारत नव्हते.. अर्थात जे या सगळ्या पासून #वंचित होते..
आणि महत्वाचे हे सगळे उमेदवार उच्च शिक्षित आहेत.. कोणावरही कसलेही आरोप नाहीत.. निष्कलंक चारित्र्याचे सगळे उमेदवार आहेत.. अन देशाच्या संसदेत शिकलेल्या लोकांना पाठवण्याचे स्वप्न फक्त एक सुजाण आणि सुशिक्षित माणूसच पाहू शकतो..
नायतर आहेतच गुन्हेगारी प्रवृत्तीचे, तडीपार अध्यक्ष..!!
असो..तूर्तास इतकेच..!!
-प्रमोद नाईक

प्रस्तुत लेखक कोकणातील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते आहेत

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *